- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
rajwadi-family-restro-akl-city: पाककृतीचा समृद्ध वारसा आणि विविध चवींचा ‘अनलिमिटेड’ उत्सव; फक्त ‘रजवाडी फॅमिली रेस्ट्रो’ मध्ये
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आता अकोल्यात देखील खाद्य प्रेमींसाठी एक नवी पर्वणी उपलब्ध झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गांधी रोडवर नव्याने सुरु झालेल्या ‘रजवाडी फॅमिली रेस्ट्रो’ मध्ये. ते सुध्दा अगदी नाममात्र शुल्कात अनलिमिटेड जेवण.
रजवाडी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये विविध चवींचा उत्सव असल्याचा खाद्य प्रेमी अनुभवतो. मसालेदार करीपासून ते मिष्टान्नांपर्यंत, प्रत्येक डिश स्वतःच वैशिष्टय सांगते.
अकोला शहरात नव्याने सुरू झालेल्या रजवाडी फॅमिली रेस्ट्रोची चर्चा सध्या खूपच रंगली आहे. कारण येथे मात्र 150 रुपयांमध्ये अनलिमिटेड ‘रजवाडी थाळी’ मिळते. ज्यामध्ये 3 भाज्या, ( 3 भाज्यांपैकी एक भाजी दररोज पनीरची दिली जाते) डाळ, कढी, भात, लोणचे , पापड, सलाद , ठेचा, पोळी असे सर्व पदार्थ अनलिमिटेड मात्र दीडशे रुपयांमध्ये येथे मिळते. यासोबत तुम्हाला स्वीट व मठ्ठा देखील मिळेल. पोळी चपाती एक्स्ट्रा घेतल्यास त्याचे सुध्दा एक्सट्रा पैसे येथे द्यावे लागत नाही. येथील जेवणाची चव ही खरोखरच अप्रतिम असल्याचे खाद्यप्रेमी सांगतात.
या हॉटेलचे इंटिरियर पाहताच मन प्रसन्न होते. सोबतच येथे बर्थडे पार्टी ,किटी पार्टी, ऑफिस मिटिंग किंवा अन्य छोटे समारंभ देखील आयोजित केल्या जाते. त्याकरिता तुमच्या स्पेशल मेनूची ऑर्डर देखील हॉटेल राजवाडी मार्फत स्वीकारल्या जाते.
येथे टेरेस गार्डन देखील उपलब्ध आहे.कमी पैशात अतिशय उत्तम,दर्जेदार आणि चवीचे असे जेवण येथे उपलब्ध असल्याने अल्पावधीच ‘रजवाडी फॅमिली रेस्ट्रो’ सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे.
रजवाडी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये, प्रत्येक डिश पाककृतीची अस्सल चव देण्यासाठी तयार केलेली आहे. अकोला मधील रजवाडी थाळीचा आस्वाद घेण्यासाठी आणि अस्सल चवीचा अनुभव घेण्यासाठी आजच रजवाडी फॅमिली रेस्ट्रोला भेट द्या. अकोला बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन पासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या रेस्ट्रोमध्ये बाहेर गावहून येणाऱ्या मंडळींसाठी उत्तम जेवणाची सोय आहे. तसेच पार्सल सुविधा सुध्दा येथे उपलब्ध असून ऑर्डर प्रमाणे जेवण तयार करुन मिळते.
एकदा तरी येथे खाद्य प्रेमींनी येवून येथील अनलिमिटेड जेवणाचा आस्वाद घ्यावा. त्यासाठी हॉटेलचा पत्ता :
रजवाडी फॅमिली रेस्ट्रो,
शनी मंदिराच्या बाजूला ताकवाले कॉम्प्लेक्सच्या समोर, अकोला.
अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 9823057030 यावर संपर्क साधावा.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा