- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला जिल्ह्यातील रेल येथील प्रसिद्ध श्री रेलेश्वर महादेव संस्थान येथील सभागृहाचे भूमीपुजन अकोला पूर्वचे भाजपचे श्री आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या संस्थेला संस्थेचे अध्यक्ष सुधाकर घुगरे यांच्या आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठपुरवठा नंतर नुकतच ' क ' वर्गाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी श्री रेलेश्वर संस्थेचेच्या सभगृहासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उपलब्ध या निधीतून या ठिकाणी भव्य सभागृहाचे निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे येथे वर्षभर साजरा होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी उपयोगी होणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष सुधाकरराव घुगरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव गोपाल इंगळे , विश्वस्त प्रताप मेहसरे, प्रकाश पुंडकरसह गावातीच प्रतिष्टीत नागरिक डॉ. सुधाकर मेहसरे, सरपंच वर्षा वानखडे, राजेश नागमते, संतोष शिवकर , उपसभापती पं.स अकोटचे विनोद मंगळे, धारेलचे सरपंच, मंगेश बुले, करोडीचे सरपंच किशोर कुले , केळीवेळीच्या सरपंच कोमल गोपाल पेटे, माजी जि.प.सदस्य शिवाजी मेहसरे , तंटामुक्ती अध्यक्ष शालीकराम तेलंगे, शालीकराम बगाडे, श्रीकृष्णा तराळे , संजय घुगरे, रामा आठे, शंकरराव इंगळे, नंदकिशोर इंगळे, गोपाल पेटे, शुभम लोणे, प्रदीप कोल्हे, मोहन कपले ,माजी उपसरपंच रेलचे मनोहर मोहन घुगरे, अध्यक्ष शिक्षण समिती रेल दुर्गा ठाकरे, मंगळा झाडे, मिरा मेनकार, धनराज मोरे, संजय घुगरे, श्रीकृष्ण तराळे, गणपत अनकुरकार , श्रीकृष्ण घुगरे, ज्ञानु खडसे यासह गावातील प्रतिष्ठित महिषा व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचं सुत्रसंचालन राहुल लिंगोट यांनी केलं.
रेल महादेव संस्थेत शिव - पार्वती विवाहची शेकडो वर्ष जुनी परंपरा आज ही संस्थेने आणि गावकऱ्यांनी जोपासली आहे हे विशेष.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा