political-party-war-ncp-vs-mns: राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावर आपण 202 टक्के ठाम - आमदार मिटकरी यांचे विधान




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांच्या नेत्यांवरच आता हल्लाबोल केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत पूर्वी केलेल्या विधानावर आपण 202 टक्के ठाम असल्याचं म्हणत मनसेतील नेते हे सुपारीबाज, सडक छाप, दारू पिणारे, पळ काढणारे असल्याची खोचक टीका मिटकरींनी केली आहे.



आमदार मिटकरी यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत अकोल्यात मनसेने केलेल्या राडा संदर्भात बोलत, मनसेच्या नेत्याचा समाचार घेतला.




मनसेचे नेते खोपकर यांनी अमोल मिटकरी यांचे कपडे फाडण्याचा इशारा दिला होता यावर बोलताना अमोल मिटकरी यांनी खोपकर यांनी माझा एकही बटन उघडला तर त्याची पाठ एका झटक्यांन सरळ करीन असा इशारा मिटकरींनी दिला. राज ठाकरे हे सुपारी बहाद्दर आहेतच असं यापूर्वी आदित्य ठाकरे यांनीही म्हटलं आहे, तर तुमची हिम्मत असेल तर आदित्य ठाकरे यांना हात लावून दाखवा, असे आव्हान मिटकरी यांनी मनसेला केला आहे.



मनसे पक्षावर बोलताना मिटकरींनी दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या राजकीय पोळ्या भाजणाऱ्या अशा पक्षात आपल्या लेकरांना न पाठवण्याची विनंती अमोल मिटकरी यांनी केली आहे. तर महायुतीत असे सडके पक्ष नको अशी विनंती ही त्यांनी केली आहे.



मनसे सैनिक जय मालोकार यांच्या मृत्यूची एसआयटी चौकशी व्हावी अशी ही इच्छा त्यांनी व्यक्त केली असून , जय मालोकार हा राष्ट्रवादीच्या संपर्कात होता आणि तो काही दिवसातच राष्ट्रवादीत प्रवेश करणार होता असल्याचंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं.



कर्णबाळा दूनबळे यांना पोलीस आज संध्याकाळपर्यंत अटक करतील, अशी अपेक्षा मिटकरी व्यक्त केली असून पोलिसांनी अटक न केल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवू, असा इशारा या वेळेस आमदार मिटकरी यांनी दिला.



टिप्पण्या