political-bjp-meeting-akola-city: लाडकी बहिण योजनेचा प्रचंड ताप महाविकास आघाडीला होत आहे- देवेंद्र फडणवीस





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. आज दुपारी अकोला आयोजित विभागीय बैठकीला भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. आपल्या भाषणातून फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजने वर टीका करणाऱ्या विरोधकांना फडणवीस यांनी खोचक टोला लगावला. 



लाडकी बहिण योजनेचा प्रचंड ताप महाविकास आघाडीला होत आहे. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. 1500 रुपयांचा महत्त्व बहिणींना माहीत असल्याचे ते म्हणाले. लाडकी बहिण योजनेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं चेहऱ्यावरील पाणी पळालं असल्याचंही फडणवीस म्हणाले. 


राज्य आणि केंद्र सरकारने

शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या असून, आगामी निवडणुकीत 365 दिवस शेतकऱ्यांना दिवसाची वीज आम्ही देऊ असा दावा फडणवीस यांनी केला. तर 1 कोटी 20 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्याचंही ते म्हणाले.



विदर्भातून कायमचा दुष्काळ संपवणारी पैन गंगा योजना दिली असून काँग्रेसने कधीही विदर्भाचा विचार केला नसल्याचा टोला त्यांनी लगावला. 


आगामी काळात फेक बातम्यांचा आम्ही आता पोल खोल सुरू करणार असल्याचं ही ते म्हणाले. बांगलादेशच्या संदर्भात बोलताना त्यांनी बांगलादेशी हे आस्तिनचे साप असून काही पक्ष बांगलादेशचा समर्थन करत असल्याचं ही ते म्हणाले.



टिप्पण्या