- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file image
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मध्य रेल्वेने नागपूर-पुणे दरम्यान सुपरफास्ट एसी स्पेशल चालविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
नागपूर - पुणे सुपरफास्ट एसी स्पेशल - ४ फेरी
गाडी क्रमांक ०२१४४ ही नागपूर येथून बुधवार, दिनांक १४.०८.२०२४ आणि शुक्रवार, दिनांक १६.०८.२०२४ रोजी रात्री ७:४० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ११:३५ वाजता पोहोचेल. अकोला येथे रात्री ११:४८ वाजता येईल.
पुणे - नागपूर सुपरफास्ट एसी स्पेशल - ४ फेरी
गाडी क्रमांक ०२१४३ ही पुणे येथून गुरुवार, दिनांक १५.०८.२०२४ आणि शनिवार, दिनांक १७.०८.२०२४ रोजी दुपारी ४:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता नागपूरात पोहोचेल. अकोला येथे पहाटे २:२० वाजता येईल.
थांबे: वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरुळी.
कोच रचना: १४ एसी थर्ड टियर + २ जनरेटर
आरक्षण: ०२१४४/०२१४४ एसी स्पेशलसाठी बुकिंग १२.०८.२०२४ रोजी सुरू होईल.
लोकमान्य तिलक टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वे
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नागपूर आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या विशेष ट्रेनमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा