morna-river-rajeshwar-setu-akl: राज राजेश्वर सेतू येथून मोर्णा नदीत वाहून गेलेल्या चिमुकल्याचा मृतदेह सापडला





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: श्री राज राजेश्वर सेतू वरून पडून मोर्णा नदीत वाहून गेलेल्या चार वर्षीय जय सचिन बोके या चिमुकल्याचा मृतदेह आज 1ऑगस्ट रोजी सकाळी सापडला. काल 31 जुलै रोजी दुपारी जय आपल्या वडिलांसोबत सेतू वरून दुचाकीने जात असताना ही घटना घडली होती.


शिवसेनेचे माजी नगरसेवक अश्विन नवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी जयचा मृतदेह शाह जुल्फिकार बाबा दर्गा रोडवरील हनुमान मंदिरासमोर नदीत तरंगताना पाहिला. आश्विन नवले व सहकाऱ्यांनी तात्काळ नदीत उतरून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.



चार वर्षाचा जय आपल्या वडिलांसोबत दुचाकीने (MH 30 AD 3817) मोर्णा नदीतील राजराजेश्वर सेतू वरून जात असताना नदीत पडून वाहून गेल्याची घटना काल बुधवारी दुपारी घडली होती. बचाव पथक घटना स्थळी पोहचून मुलाचा शोध युद्ध पातळीवर सुरू केला होता.




अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आल्याने मोर्णा नदीला पूर आला होता. या पुरामुळे अकोला शहरातील मध्यभागी असलेल्या मोर्णा नदीत असलेला राज राजेश्वर सेतू हा पाण्याखाली गेला होता.

दरम्यान एका व्यक्तीने आपल्या 4 वर्षीय बालकासोबत पुलावर गाडी टाकली होती. पाण्याच्या प्रवाहात गाडीचा तोल गेला होता आणि 4 वर्षीय जय सचिन बोचे (राहणार शिवसेना वासाहत) हा पाण्यात वाहून गेला होता. काल पासून  पिंजर येथील आपत्कालीन पथक आणि अकोला महानगरपालिका अग्निशामक विभागा तर्फे या मुलाचा युद्ध पातळीवर शोध घेण्यात आला होता. मात्र काल सायंकाळ पर्यंत तो सापडून आला नव्हता. 




आज पहाटे पासून शिवसेनेचे माजी नगरसेवक आश्विन नवले यांनी नदीत पाहणी केली असता अखेर 15 तासानंतर त्यांना या बालकाचा मृतदेह दिसून आला. आश्विन नवले यांनी स्वतः नदीत उतरून या मुलाचा मृतदेह बाहेर काढला.



टिप्पण्या