mitkari-car-vandalism-case-akl: आमदार अमोल मिटकरी यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या; कर्णबाळा दुनबळे यांच्या अटकेची मागणी




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: मनसे सैनिकांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न व कारची तोडफोड  शासकिय विश्रामगृह येथे 30 जुलै रोजी केली होती. मात्र आता हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे. हल्ल्यानंतर अमोल मिटकरी आक्रमक झाले असून, या घटनेसाठी मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांना अटक करा, अशी मागणी करत त्यांनी आज गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मुलगी आणि भाऊ यांच्या समवेत ठिय्या आंदोलन केले आहे.



अकोला पोलीस अधिकारी मनसेच्या कर्णबाळा दुनबळे यांची हॉटेलमध्ये जाऊन गळाभेट घेतात. तसेच मनसे पक्षाच्या लोकांना अकोला पोलीस पाठीशी घालत आहेत. हे मनसेचे गुंड कोणाच्या जीवावर उडतात, हे माहिती आहे. तसेच अकोला पोलिसांनी कर्णबाळा दुनबाळेंना अद्याप अटक का केली नाही. असा सवाल अमोल मिटकरी यांनी करीत अकोला पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. एका आमदारावर हल्ला होवून त्यालाच न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसांना पोलीस काय सहकार्य करीत असेल, असा प्रश्न आमदार मिटकरी यांनी उपस्थित केला.





दरम्यान दुसरीकडे कर्णबाळा दुनबळे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतिर्थ येथे भेट घेतली आहे. ही भेट अकोल्यात झालेल्या राडा संदर्भात झाली असल्याचे कळते. 



टिप्पण्या