- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
mitkari-car-vandalism-case-ak: मनसे नेते कर्णबाळा दूनबळे यांना कोणत्याही क्षणी होवू शकते अटक; अकोला पोलीस मुंबईला रवाना
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या वाहनाच्या तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कर्णबाळा दूनबळे यांना अटक करण्यासाठी अकोला पोलिसांचे पथक मुंबई करिता रवाना झाल्याची सूत्रांनी माहिती आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी कर्णबाळा दूनबळे यांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कर्णबाळा दूनबळे यांच्यासह 13 मनसे सैनिकांवर अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एक मृत पावला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यापैकी तीन जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे तर सहा जणांना काल एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कर्णबाळा दूनबळे यांनी आपण स्वतः अकोल्याला येवून जामीन घेणार असल्याचं वक्तव्य केलं होतं तर आता अकोला पोलीस त्यांना अटक करण्यासाठी मुंबईला रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान अमोल मिटकरींनी काल कर्णबाळा दूनबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन केले होते.
दुसरीकडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल मिटकरी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून मोर्चा काढला होता.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा