kedia-house-robbery-case-akl: केडिया हाऊस दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी पुष्पराजचा जामीन अर्ज मंजूर





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बहुचर्चित केडिया हाऊस दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी पुष्पराज शाह याचा जामीन अर्ज अकोला न्यायलयाने अटी व शर्तीवर मंजूर केला आहे.



27 जून 2024 रोजी न्यु आळशी प्लॉट अकोला शहर येथील रहिवासी नंदकिशोर अमृतलाल केडीया यांचे घरात अज्ञात लोकांनी दरोडा टाकुन त्यांचे घरातुन नगदी रूपये आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जबरीने चोरून घेवून गेले होते. अश्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन खदान अकोला येथे अप.नं 521/2024 कलम 452,392,397,34 भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंद करुन तपासास घेण्यात आला होता.


केडिया यांचे घरी चार इसम आले होते. त्यातील पोलीस गणवेशतील इसमाने घरातील महिलांना हरवलेली मुलगी शोधायची आहे, म्हणून घरात प्रवेश करून घरातील महिलांना चाकू दाखवून  जीवे मारण्याची धमकी देऊन घरातील सोने व रोख रक्कम घेऊन फरार झाले होते,असे पोलीस तपासात समोर आले होते.


या प्रकरणातील मुख्य आरोपी पुष्पराज शाह याला इतर आरोपी सोबत सुरत येथून 2 जुलै 2024 रोजी अटक केली होती. पी. सी आर. कालावधी संपल्यावर न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली होती. 


दरम्यान, 12 ऑगस्ट 2024 रोजी सत्र न्यायालय अकोला येथे मुख्य आरोपी पुष्पराज शाह याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून 30,000 रूपयेच्या जातमुचलक्यावर अटी व शर्ती सह न्यायलयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला. 



आरोपीचे वतीने ॲड. गजानन रामकृष्ण भोपळे सह ॲड. अनिल ढोले, ॲड. अमोल डोंगरे यांनी मुख्य आरोपी पुष्पराज शाह याची न्यायालयात बाजू मांडली. 

टिप्पण्या