impact-kolkata-incident-akola: कोलकाता मधील घटनेचा अकोल्यात पडसाद; निवासी डॉक्टरांनी काढला कँडल मार्च





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण देशात या घटनेच्या निषेधार्थ संतापाची लाट पसरली आहे. अकोला जिल्ह्यात देखील या घटनेचा पडसाद उमटला. आज शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय निवासी डॉक्टरांनी घटनेचा निषेध करीत पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी कँडेल मार्च काढला.



मार्ड (महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स) संघटनेचे सदस्य  रॅलीत सहभागी झाले होते.





आज अकोला शहराच्या मुख्य रस्त्यांवर ही रॅली काढून निवासी डॉक्टरांनी पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळावा याकरिता हा कॅन्डल मार्च काढला. 







यावेळी शेकडो डॉक्टरांनी काळी फित बांधून या घटनेचा निषेध करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

टिप्पण्या