- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
first-automated-testing-center-in-akola: अकोला मधील पहिल्या स्वयंचलित चाचणी केंद्राची पायाभरणी; रोसमेर्टा टेक्नॉलॉजीजचे महाराष्ट्रातील दुसरे एटीएस
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: रोसमेर्टा टेक्नॉलॉजीज महाराष्ट्र राज्यात त्यांचे दुसरे ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन (एटीएस) स्थापन करत असल्याची घोषणा रविवार 18 ऑगस्ट रोजी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल, विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला, जयश्री दुतोंडे हे होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये अजित कुंभार जिल्हाधिकारी, अकोला, बच्चन सिंग पोलीस अधीक्षक, अकोला, रणधीर सावरकर विधानसभा सदस्य, अकोला पूर्व, प्रकाश भारसाकळे विधानसभा सदस्य, अकोट, नितीन देशमुख विधानसभा सदस्य, बाळापूर, हरीश पिंपळे विधानसभा सदस्य, मूर्तिजापूर, किरण सरनाईक विधान परिषद सदस्य, धीरज लिंगाडे विधान परिषद सदस्य, गोपीकिशन बाजोरिया माजी विधान परिषद सदस्य आणि सुमित ललित उपाध्यक्ष, रोसमेर्टा टेक्नॉलॉजीज. रोसमेर्टा टेक्रॉलॉजीजच्या या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने समर्थन दिलेले आहे.
2015 मध्ये नाशिक येथे देशातील पहिले वाहन तपासणी आणि प्रमाणन केंद्र स्थापन करण्यात महाराष्ट्र राज्याने प्रमुख भूमिका बजावली आहे. भारत सरकारने देशभरात एटीएसचे नेटवर्क स्थापन करण्याचे धोरण जाहीर केल्यापासून निविदा प्रक्रियेद्वारे राज्यात अनेक एटीएस स्थापन करण्यासाठी धोरण तयार करण्यात राज्य विभाग मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. आता त्यांनी निविदा मंजूर केली आहे. रोसमेर्टा ही अशा कंपन्यांपैकी एक आहे जी संपूर्ण राज्यात 21 केंद्रे स्थापन करणार आहे. त्याबरोबरीनेच नाशिक येथील केंद्र देखील लवकरच एटीएसमध्ये अपग्रेड केले जाणार आहे.
या समारंभामध्ये उपस्थितांना संबोधित करताना, विधानपरिषद सदस्य, अकोला वसंत खंडेलवाल म्हणाले, "अकोल्यातील पहिले ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन (एटीएस) ची स्थापना होत आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची वाव आहे. महाराष्ट्र राज्यातील रस्ते सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) समर्थन दिलेला, रोसमेर्टा टेक्नॉलॉजीजचा हा उपक्रम नागरिकांसाठी रस्ते सुरक्षित करण्याप्रती राज्य आणि केंद्र सरकारची वचनबद्धता दर्शवतो.
ही तांत्रिकदृष्ट्या प्रगत एटीएस केंद्रे वाहने रस्त्यावर येण्याच्या योग्यतेची आहेत अथवा नाही याचे वैज्ञानिक मूल्यांकन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. परिणामी, अयोग्य वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचा धोका कमी होईल. ही केंद्रे स्थापन करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. आम्हाला खात्री आहे की हा उपक्रम रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी आणि नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी सुरू असलेल्या आमच्या प्रयत्नांमध्ये भरीव योगदान देईल. रोसमेर्टा टेक्नॉलॉजीजकडून केल्या जात असलेल्या निष्ठापूर्वक प्रयत्नांचे मी कौतुक करतो. त्यांच्या या प्रयत्नांचा राज्यातील रस्त्यांवर सकारात्मक परिणाम पाहण्यास मी उत्सुक आहे."
राज्य आणि केंद्र सरकारचे धोरणात्मक उपक्रम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानताना, रोसमेर्टा टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष कार्तिक नागपाल म्हणाले, "जवळपास 70% लोक आणि सामानाची वाहतूक रस्त्यावरून होते आणि तरी देखील रस्ते वाहतुकीच्या सुरक्षिततेला जितके दिले पाहिजे तितके महत्त्व दिले जात नाही. अपघातांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब लक्षात घेता टाळता येण्याजोग्या घटना टाळण्यासाठी, अपघाती मृत्यू आणि जखमींचे प्रमाण कमीत कमी करण्यासाठी देशामध्ये ठोस उपाययोजनांची गरज आहे. स्वयंचलित चाचणी उपाय अयोग्य वाहनांमुळे होणारे अपघात रोखू शकतात. अशा प्रकारे रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि जखमींचे प्रमाण कमीत कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षेच्या राष्ट्रीय उद्दिष्टांमध्ये हातभार लावला जाऊ शकतो. प्रत्यक्षात बदल घडवून आणत असल्याबद्दल आणि रस्ते वाहतुकीच्या गतिमान परिवर्तनात आघाडीवर राहिल्याबद्दल रोसमेर्टा टेक्रॉलॉजीज महाराष्ट्र सरकारचे आभार मानत आहे."
सुधारित मोटार वाहन अधिनियमाच्या कलम 56 अंतर्गत सार्वजनिक सेवा वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट जारी करण्यासाठी भारत सरकारने (MoRTH) देशभरात एटीएसचे नेटवर्क तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी, सीएमव्हीआरमध्ये "स्वयंचलित चाचणी स्टेशनला मान्यता, नियमन आणि नियंत्रण" साठी नवीन चॅप्टर XI चा समावेश करण्यात आला. हे देखील सूचित करण्यात आले आहे की, १ ऑक्टोबर 2024 पासून सर्व सार्वजनिक सेवा वाहनांची चाचणी केवळ एटीएसमार्फत करणे आवश्यक आहे. ही आवश्यकता पूर्ण करण्याच्या अनुषंगाने, सर्व राज्य सरकारे त्यांच्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य एटीएस केंद्रे स्थापन करण्यासाठी, फिटनेस सर्टिफिकेट जारी करण्यासाठी वाहनांची चाचणी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करत आहेत.
रोसमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 2015 साली नाशिक येथे पहिले पायलट केंद्र स्थापन केले. या केंद्राचे उद्घाटन माननीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते आणि तेव्हापासून हे केंद्र सुरळीतपणे सुरू आहे. महाराष्ट्र राज्याचा परिवहन विभाग संपूर्ण राज्यात एटीएस स्थापन करणारा देशातील पहिला विभाग आहे. या विभागाने संपूर्ण राज्यात एटीएस केंद्रे स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. रोसमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेडला राज्यात 21 एटीएस केंद्रे स्थापन करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. बारामती एटीएसचे उद्घाटन यापूर्वीच झाले असून तिथे कामाला सुरुवातही झाली आहे.
एटीएस अर्थात स्वयंचलित चाचणी केंद्र स्थापना करण्याचे मुख्य उद्दिष्ट वाहतुकीसाठीची वाहने रस्त्यावरून येण्यापूर्वी ती रस्त्यावर आणण्याच्या योग्यतेची आहेत याची शास्त्रोक्त पद्धतीने चाचणी करणे हे आहे. पूर्णपणे स्वयंचलित चाचणी लेन उपकरणांवर ऑनलाइन बुकिंगद्वारे ही चाचणी केली जाते आणि त्याचा डेटा VAHAN वर अपलोड केला जातो. त्यानंतर VAHAN पोर्टलद्वारे फिटनेस प्रमाणपत्र जारी केले जाते. यामध्ये मॅन्युअल हस्तक्षेप अजिबात केला जाऊ शकत नाही. या एटीएस केंद्रांच्या स्थापनेमुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची सुरक्षितता वाढेल आणि जीवघेणे अपघात कमी होतील. मॅन्युअल हस्तक्षेप टाळल्यामुळे, वाहतूक चालकांना कोणताही त्रास न होता फिटनेस प्रमाणपत्र जारी करण्यात मदत होईल आणि यामुळे वेळेची लक्षणीय बचत होईल.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा