District-Level-School-Football: जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात; ताज इंग्लिश हायस्कूलची विजयी सलामी




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन 26  ते 31 ऑगस्ट पर्यंत अकोला मनपा क्षेत्र व 3 ते 4 सप्टेंबर रोजी अकोला जिल्हा क्षेत्र यांचे आयोजन केलेल आहे. 


या स्पर्धेला उदघाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा l अंधारे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अकोला जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अमोल रावणकर, मुन्ना ठाकूर (पहेलवान), भारतीय युवा मोर्चा  उपाध्यक्ष आनंद कदम  होते. तर अध्यक्ष म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी  सतीश भट्ट सर होते. तर संयोजक म्हणून अकोला मनपा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बुढन गाडेकर  हे होते, स्पर्धा संयोजक म्हणून फुटबॉल राज्य क्रीड़ा मार्गदर्शक सुरजकुमार सईद खान (एन. आय. एस.  कोच ) उपस्थित होते काल दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या 14 वर्षातील मुलांच्या वयोगटात सुफ्फा इंग्लिश स्कूल विजयी ठरले तर उस्मान आझाद उर्दू हायस्कूल उपविजयी ठरले.


आज झालेल्या 17 वर्षातील मुलांच्या वयोगटातील सामने खालीलप्रमाणे 



ताज इंग्लिश हाय. ×नोवेल स्कूल (सिबिएसई), ताज इंग्लिश हाय.2- 1 ने विजयी.


 न्यू इंग्लिश हायस्कूल × ताज उर्दू हायस्कूल, न्यू इंग्लिश हाय. 4-0 ने विजयी.


 श्री समर्थ पब्लिक स्कूल × नेमत बेगम उर्दू हायस्कूल, नेमत बेगम हाय. 0-2 ने विजयी.


 प्रभात किड्स स्कूल × इंदिरादेवी खंडेलवाल हायस्कूल,प्रभात किड्स स्कूल 2-0 ने विजयी.


जि. एस. कॉन्व्हेंट × पोदार इंटर नॅशनल स्कूल, जि. एस. कॉन्व्हेंट 2-0 ने विजयी.


 होलीक्रॉस हाय. × इम्राल्ड हाय., इम्राल्ड हाय. 2-0 ने विजयी.


सेंट आंन्स हाय. × अली पब्लिक स्कूल, अली पब्लिक स्कूल 0-2 ने विजयी.


आर. डी.जी. × एस.आर.ए. इंग्लिश स्कूल, आर डी जी स्कूल ला पुढेचाल देण्यात आली.


 नूतन हिंदी शाळा × श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा,श्री शिवाजी विद्यालय   0-2 ने विजयी.


उस्मान आजाद उर्दू हायस्कूल × सन्मित्र पब्लिक स्कूल, उस्मान आझाद उर्दू हायस्कूल 4-0 ने विजयी. 



पावसामुळे पुढील सामने उद्या दुपारनंतर चालू होतील. 




स्पर्धेत पंच म्हणून जुनेद खान, अंजार अहमद कुरेशी, शम्मास उजेर, शाहिद खान, मोईन खान,शोएब खान, जाहिद खान , इर्शाद खान जमादार, सईद खान, फैजान बेग, यांनी कामगिरी केली. जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून फुटबॉल राज्य क्रीड़ा मार्गदर्शक  सुरज दुबे, निशांत वानखडे, रहीम खान परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या