- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
desecration-statue-shiv-sainik: छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अवहेलना; शिवसैनिकांनी व्यक्त केला संताप
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे घाई घाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा अनावरणानंतर अवघ्या आठ महिन्यात पूर्णत: कोसळला. या पुतळ्याच्या दर्जावरून आज मंगळवारी दुपारी 4.30 वाजता सध्याचे शिंदे व भाजप सरकारवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अकोला शहर व जिल्हाच्या वतीने महात्मा गांधी चौकात संताप व्यक्त करून निषेध नोंदविण्यात आला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक नेते राजेश मिश्रा यांनी निषेध व्यक्त करताना शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले. अरबी समुद्रातील शिवस्मारकाची एकही वीट न रचता करोडो रुपये खाणाऱ्यांनी आज शिवरायांचा पुतळा उभारताना पण भ्रष्टाचाराची माती खाल्ली आहे. मोदी उद्घाटनाला येणार म्हणून पुतळा घाईघाईने बनवला का,असा सवाल करीत महायुतीने आज पुन्हा एकदा शिवरायांचा अवमान केला असून छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना अतिशय वेदनादायी असल्याचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी यावेळी म्हंटले.
गांधी चौकात निषेध नोंदविल्या नंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्याकडे शिवसैनिकांनी आपला मोर्चा वळविला. सिटी कोतवाली चौकात देखील निदर्शने देवून विद्यमान राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना करण्यात दोषी असलेल्या संबंधितांवर यावेळी सिटी कोतवाली पोलिस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे, शहरप्रमुख राजेश मिश्रा, सागर भारुका, सुरेंद्र विसपुते, योगेश गीते, नितीन ताकवाले, मंगेश काळे, सतिश वानरे आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा