crowd-gold-chain-thieve-activ: श्रावणात शिवालयात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोर सक्रीय; राजेश्वर मंदिरातील घटना सीसीटिव्हीत कैद




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून शिवालयात  दर्शनाकरिता होणाऱ्या गर्दीचा फायदा आता चोरटे घेत आहेत. अकोल्याचे ग्रामदैवत श्री राज राजेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची प्रचंड गर्दी होते आणि याच गर्दीचा फायदा सोनसाखळी चोर, पाकीटमार घेत असल्याचं दिसून येत आहे. 



शिवलिंगला जलाभिषेक करताना  गर्दीचा फायदा दोन महिलांनी घेतला असून, एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पोबारा केल्याची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. 



दोन्ही महिलांनी या वृद्ध महिलेच्या अंगावर भार टाकला आणि गळ्यातील चेन तोडून पोबारा केला. या घटने संदर्भात जुने शहर पोलिसात तक्रार देण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपी महिलांचा आता शोध घेत आहे.





यासंदर्भात जुने शहर पोलीस स्टेशन येथे अप. नं. 433/2024 कलम 304(2) BNS प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार सुशीला आमप्रकाश अग्रवाल (वय 74 वर्ष, रा. गोरक्षण रोड) या  05 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान मुलगी भारती अग्रवाल सोबत पहीला श्रावण सोमवार असल्याने श्री राजेश्वर मंदीर जुने शहर अकोला येथे दर्शनाकरीता आल्या होत्या. 



गाभा-यात दर्शन करतेवेळी त्यांच्या गळ्यात असलेली सोन्याची पॅन्डलची पोत ज्याचे वजन 36 ग्रॅम 920 मी.ली. चे दिसुन आली नाही. आजु बाजू दशर्नाकरीता आलेले लोंकाना त्यांनी विचारपुस केली. मात्र पोत सापडली नाही. 



तक्रारदार अगरवाल व मुलगा गणेश अग्रवाल तसेच पोलिसांनी मंदिरातील CCTV फुटेज बघीतले असता, फुटेजमध्ये अज्ञात महिलेने अगरवाल यांच्या गळ्यातील सोन्याची पोत झपटमारी करुन चोरून नेल्याचे दिसत आहे.  अग्रवाल यांनी याबाबत 06 ऑगस्ट रोजी तक्रार नोंदविली. सोन्याच्या पोतचे वजन 36 ग्रॅम 920 मी.ली.असून किंमत अंदाजे 1,80,000 रूपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 


श्री राजेश्वर मंदीरामध्ये दर्शनकरिता गर्दीचा फायदा घेत चोरटे हातसफाई करतात. भाविकांनी दर्शनाकरिता येताना शक्यतो मौल्यवान वस्तू, दागिने परिधान करुन येवू नये. तसेच आपल्या सोबत आणलेल्या साहित्याची काळजी घ्यावी, असे आवाहन अकोला पोलीस प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे.

टिप्पण्या