cow-guards-march-sp-office: पोलीस अधीक्षक कार्यालयावर गोरक्षकांचा धडक मोर्चा





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरातील जुने शहरामध्ये काही दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात गोवंशाच्या चोरीच्या घटनेत वाढली. यामुळे नागरीक त्यांच्या गायीचे राखण करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागरण करीत आहे. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 3 ते 4 च्या दरम्यान नागरीकांच्या हाती या गोवंश चोरी टोळीचा मुख्य सुत्रधार लागला असता, काही लोकांनी स्वतःच्या जिवाची परवा न करता त्याला पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले व त्यानंतर ज्यांनी या अटल गुन्हेगाराला पकडून दिले त्यांच्यावरच पोलीस प्रशासनाने कार्यवाही करत गुन्हे दाखल केले. मात्र गोवंशाचा मुख्य आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप करीत गोरक्षकानी आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला. 


मोर्चामध्ये विजय अगरवाल, अनुप शर्मा, भरत मिश्रा, उमेश लखन, राजू नेरकर आदींसह शेकडो गोरक्षक मोर्चात सामील झाले होते.





गोवंश चोरीच्या मुख्य आरोपीला अटक करून न्याय मिळावा, यासाठी हा धडक मोर्चा काढण्यात आला होता.




टिप्पण्या