convocation-ceremony-police: महिला पोलीस प्रशिक्षणार्थींनी प्राप्त ज्ञानाचा वापर जनतेच्या सेवेसाठी करावा - प्रवीण पडवळ यांचे वक्तव्य





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला येथे आज महिला पोलीस शिपाई सत्र क्रमांक 65 चा दीक्षांत समारंभ प्रवीणकुमार पडवळ, विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या उपस्थितीत पार पडला.





पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सत्र 65 मधील 737 प्रशिक्षणार्थी महिला पोलिस शिपाई यांचे सहा महिन्यापासून प्रस्किक्षण सुरू झाले होते. पोलिस शिपाई पदाचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्याने त्यांचा दीक्षांत संचलन समारंभ पार पडला.



यावेळी राज्यभरातून या महिला पोलीस शिपाईंचे कुटुंबीय सुद्धा हा दिमाखदार सोहळा पाहण्यासाठी हजर होते..या कार्यक्रमा दरम्यान प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पारितोषिक सुद्धा देण्यात आले.




या वेळी पोलीस विशेष महानिरीक्षक प्रवीण पडवळ यांनी प्रशिक्षणार्थींनी केंद्रात प्राप्त ज्ञानाचा वापर करुन जनतेस सेवा द्यावी, आदर्श माणूस व आदर्श पोलिस म्हणून नावलौकीक मिळवावा. कायद्याचा योग्य वापर करावा तसेच कायद्याचे ज्ञान , अत्याधुनिक प्रणालीचे ज्ञान आत्मसात करुन त्याचा कामकाजात अचूक वापर करण्याबाबत मार्गदर्शन सुद्धा केले.



पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला येथे शुक्रवार 30 ऑगस्ट  रोजी सत्र क्रमांक 65 चे महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांचा दीक्षांत संचलन समारंभ संपन्न




पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला येथील सत्र क्रमांक 65 मधील 737 प्रशिक्षणार्थी महिला पोलीस शिपाई यांचे  26 फेब्रुवारी ते 30 ऑगस्ट 2024 दरम्यान मूलभूत प्रशिक्षण पार पडले आहे. नवीन कायदयानुसार प्रशिक्षण घेणारी ही पहिलीच प्रशिक्षण तुकडी असुन, सदर प्रशिक्षण पुर्ण करण्याकरिता प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी अथक परिश्रम घेतले. त्यानुसार नवप्रविष्ठ पोलीस शिपाई यांचे प्रशिक्षणाचा दिक्षांत समारोह आज प्रविण पडवळ, विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. 




दिक्षांत समारोह प्रसंगी  बी. वैष्णवी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी,  सुनिल लहाने, महानगर पालीका आयुक्त, अमोल मिटकरी, आमदार विधानपरिषद, सतिशचंद्र भट, क्रीडा अधिकारी, अकोला, डॉ  आरती कुलवाल , उपसंचालक आरोग्य सेवामंडळ, अकोला,  सतिश कुलकर्णी, उप विभागीय पोलीस अधिकारी, अकोला शहर तसेच जिल्हयातील इतर गणमान्य अतिथी यांची उपस्थिती होती.


दिक्षांत संचलन प्रसंगी प्रभारी प्राचार्य,  पूनम पाटील यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना शपथ प्रदान केली. तसेच पो.प्र.केद्र, येथील सुविधांबाबत व प्रशिक्षण सत्राबाबत अहवाल वाचन करुन, सर्व प्रशिक्षणार्थीना त्यांच्या पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.


याव्यतिरिक्त प्रविणकुमार पडवळ विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी आपले प्रमुख अतिथी भाषणात सर्व प्रशिक्षणार्थीचे अभिनंदन करुन, त्यानुसार प्रशिक्षणार्थी यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा वापर करुन जनसामान्याकरिता आपली सेवा प्रदान करावी. तसेच भविष्यातील सायबर क्राईम व महिलांविषयक गुन्हयांमध्ये संवेदनशील भूमिका बजावून सामान्य जनतेचे रक्षण करुन, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य सद्रक्षणाय, खलनिग्रनाय यास अनुसरुन भविष्यातील आपले कर्तव्य पार पाडावे. या करिता मार्गदर्शन केले व सर्व प्रशिक्षणार्थीचे पुनश्चः अभिनंदन करुन, त्यांचे पुढील सेवेसाठी सदिच्छा दिल्या.




दिक्षांत परेडचे नेतृत्व नवप्रविष्ठ पो. अंमलदार आरती बर्गे, मुंबई शहर यांनी केले असुन, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा मान नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार अश्विनी घारे, पुणे शहर यांनी पटकावला असुन, सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण करुन आप-आपल्या घटकात जिल्हयात पोलीस दलात रुजू होत आहेत, अशी माहिती पूनम पाटील प्रभारी प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला यांनी दिली.

टिप्पण्या