- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
amit-thackeray-nimbi-village: जय मालोकार यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी मनसे युवा नेते अमित ठाकरे निंबी गावात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या मनसे सैनिक जय मालोकार यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे आज गुरूवार 1 ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातील निंबी (मालोकार) गावात आले होते.
अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते.
अमित ठाकरे यांच्यासोबत अकोला, वाशिम आणि बुलढाणाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मनसे कार्यकर्ता हजर होते.
यावेळी आपण कोणतही राजकारण करण्यासाठी येथे आलो नसून कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचे अमित ठाकरे म्हणाले. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे मध्ये झालेला राडा व अन्य राजकिय गोष्टींवर काहीही भाष्य करणे अमित ठाकरे यांनी टाळले.
याप्रसंगी अमित ठाकरे यांनी मालोकार कुटुंबीयांना आर्थिक मदतही दिली आहे. सोबतच जय मालोकार यांचे मनसे जिल्हाध्यक्ष बनण्याचा स्वप्न अपुरे राहिले होते, ते अमित ठाकरे यांनी मरणोपरांत पूर्ण केले.
जय मालोकार मृत्यु घटनेची सखोल चौकशी करणार असल्याचे आश्वासन यावेळी अमित ठाकरे यांनी कुटुंबियांना दिले. तसेच राज ठाकरे सुद्धा काही दिवसांनी भेट देणार असल्याचंही अमित ठाकरे यांनी मालोकार कुटुंबीयांना सांगितले.
यावेळी जय मालोकार यांचे आई वडील, मोठे भाऊ विजय मालोकार यांच्यासह आप्तेष्ट व गावकरी उपास्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा