state-needs-double-engine-akl: राज्याला डबल इंजिनची आवश्यकता-चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : राज्याला डबल इंजिनची आवश्यकता असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी विधानसभेत भाजप एकनाथ शिंदे सोबत असणार की अजित पवार असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


भाजपच्या पश्चिम विदर्भातील संघटनात्मक बैठकीत करिता चंद्रशेखर बावनकुळे आज अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.



काँग्रेसच्या काळात शहांवर आरोप लावले, न्यायव्यवस्थेने त्यांना क्लीन चीट दिली आहेय, काँग्रेसची आणि शरद पवार यांची सत्तेपासून पैसा अशी विचारधारणा असल्याची खोचक टीका बावनकुळे यांनी केली.


शरद पवार यांनी सत्तेपासून पैसा असं राजकरण आयुष्यभर केलं असल्याचंही बावनकुळे म्हणाले. अमित शाह यांच्यावर टिका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारख असल्याचं बावनकुळे म्हणाले.


अनिल देशमुख हे खोटारडे असून गृहमंत्री असताना तेव्हाच त्यांनी खुलासा करायला पाहिजे होता, आता माझ्यावर दबाव होता अस सांगत आहे, गृहमंत्री असताना दबाव टाकतो म्हणून जेल' मध्ये टाकायचं होतं. आता हे सर्व खोटारडापणा सूरू असून हा बिझनेस सुरू असल्याचे ते म्हणाले.


महाविकास आघाडीकडे 14 मुख्यमंत्री झाले असून उद्धव ठाकरे हे 15 वे मुख्यमंत्री असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.




मोदी सरकारच्या योजनांचा लाभ विदर्भातील आणि मराठवाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवायच्या असेल तर डबल इंजन सरकार द्या, असा उल्लेख चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तर माहविकास आघाडीला मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लाऊन फायदा घ्यायचा असल्याचं ही ते म्हणाले. 


टिप्पण्या