- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील अकोला शहर जवळील रिधोरा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या MH 09 EM 1792 शिवशाही बसला आग लागल्याची घटना आज गुरूवार 25 जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
शेगावहून अकोल्याच्या दिशेने विना वाहक येत असलेल्या या बस मध्ये सुमारे 20 प्रवाशी प्रवास करत होते. गाडीतून सुरुवातीला धूर निघून आला. प्रसंगावधान साधून चालक पुरुषोत्तम डोंगरे यांनी बस रस्त्याच्या कडेला उभी केली. यातील सर्व यात्री बसच्या बाहेर निघाले. पाहता पाहता या बसने पेट घेतला. बस जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी अकोला व बाळापूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविण्यास आल्या. यामध्ये एस टी महामंडळाचे मोठ नुकसान झालं.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र बसचालक पुरुषोत्तम डोंगरे यांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा