road-accident-car-motorcycle : रस्ते अपघात: कार व मोटारसायकलची धडक; पीएसआय राजेंद्र मोरे जागीच ठार




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : बोरगाव मंजू ते मुर्तिजापूर मार्गावरील कुरणखेड येथे आज सायंकाळी वाहनांच्या धडकेत झालेल्या अपघातात बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे पीएसआय राजेंद्र मदन मोरे (वय 43) यांचा जागीच मृत्यू झाला.

       

मूळचे रिसोड (वाशिम जिल्हा) येथील रहिवासी असलेले राजेंद्र मोरे हे बोरगाव मंजू (अकोला जिल्हा) पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते. आज कर्तव्यावर असताना संध्याकाळी ते त्यांच्या दुचाकीने (एमएच 30 एबी 4975)  तपासकामी मूर्तिजापूर कडे जात होते. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ते कुरणखेड जवळ आले असता विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या कारने (एमएच 30 पी 2788) त्यांच्या दुचाकीला धडक दिली.  ही धडक इतकी भीषण होती की मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळातच  गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य सुरू केले.

      


घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे घटनास्थळी पोहोचले. दरम्यान पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

 

टिप्पण्या