rain-update-morna-river-flood: मोर्णा नदीला पूर; राजेश्वर सेतू पाण्याखाली, सतर्कतेचा इशारा




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : काल रात्री अकोला जिल्ह्यातील पातुर आणि बार्शीटाकळी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या जोरदार पावसामुळे अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर आला आहे.




मोर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जुन्या शहराला नवीन शहराशी जोडणारा राजेश्वर सेतू पाण्याखाली गेला आहे.





जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पूल ओलांडण्यास मनाई केली आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पण्या