भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने वाटचाल सर्व असून, महाराष्ट्र देशातील एक नंबरचे सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतिशील राज्य म्हणून काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात विकास गतिशील होत असून, आगामी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला प्रचंड बहुमत मिळेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
दर्यापूर येथे खाजगी कार्यक्रमात जात असताना आज रविवारी ते अकोला शहरात आले होते. यानिमित्त अकोला भाजपाच्या वतीने अशोक चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
माजी खासदार संजय धोत्रे, खासदार अनुप धोत्रे, प्रदेश भारतीय जनता पक्ष सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील, विजय अग्रवाल, जयंत मसने यांच्या नेतृत्वात अशोक चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले.
अफवा पसरून सतत खोटे बोलून अपप्रचार करण्याचा ठेका उद्धवसेना व काँग्रेस सुळे राष्ट्रवादी गटाने केला आहे. यापासून सावध राहण्याची गरज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना समाजाच्या सर्व घटकासाठी असताना ही योजनेचा लाभ मिळू शकणार नाही असा अपप्रचार करून सर्वसामान्यांना वंचित ठेवण्याचे काम महाविकास आघाडी करून सुरू असल्याचा आरोप खासदार चव्हाण यांनी केला.
भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता शिस्त आणि विचारांशी बांधिल असून जनसंपर्क तीन महिने महत्त्वाची आहे. जनतेशी संपर्क ठेवून 200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा संकल्प महायुतीचे नेत्यांनी मुंबई येथे केला आहे. याला पूर्ण करण्यासाठी कामाला लागा, असे यावेळी खासदार चव्हाण म्हणाले.
विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली माधव मानकर, डॉक्टर किशोर मालोकार, गिरीश जोशी, पवन महल्ले , संजय गोटफोडे, ऍड. देवाशिष काकड ,संदीप गावंडे ,संतोष पांडे, दिलीप मिश्रा, संजय जोशी, विकी ठाकूर, रमेश करिहार, गणेश अंधारे, वैभव मेहरे, सागर तिवारी, अभिषेक भगत, मनोज शाहू, प्रशांत अग्रवाल, प्रशांत अवचार, सिद्धार्थ शर्मा, निलेश निनोरे, अजय भारसाकले, विठ्ठल देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अकोला जिल्हा भाजपाच्या वतीने अशोक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी, प्रास्ताविक विजय अग्रवाल तर आभार प्रदर्शन माधव मानकर यांनी मानले.
मराठा आरक्षण संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय
यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा हा शांततेच्या मार्गाने असून, या दौऱ्याचं निश्चितच सकात्मक परिणाम आगामी काळात दिसून येणार असल्याचं भाजप नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं. तर मराठा आरक्षणा संदर्भात आतापर्यंत राज्य सरकार द्वारे चांगले निर्णय घेण्यात आले असून, आरक्षण संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण संदर्भात मुंबई येथे बोलण्यात आलेल्या बैठकीत आपण सदर राहणार असल्याच अशोक चव्हाण म्हणाले.तर एकनाथ खडसे भाजप मध्ये आले तर त्यांचं स्वागत असल्याचंही चव्हाण म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा