- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ncp-mns-master-mind-attack : या हल्ल्याचा मास्टर माईंड राज ठाकरे आहेत का? अमोल मिटकरी यांचा सवाल; 13 मनसे सैनिकांवर गुन्हे दाखल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मनसे सैनिकांनी तोडफोड केल्यानंतर मनसे सैनिकांवर गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी आमदार अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. अखेर चार तासानंतर गुन्हे दाखल झाल्यानंतर आमदार मिटकरी यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
तब्बल 4 तासानंतर मनसे सैनिकां विरोधात गुन्हे दखल करण्यात आले आहे. आपल्या जिवाला धोका असून मनसे कार्यकर्त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर आपल्यावर हल्ला केला असल्याचा आरोप यावेळी अमोल मिटकरी यांनी केला. या संपूर्ण घटनेची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. तर या हल्ल्याचा मास्टर माईंड राज ठाकरे आहेत का, याचाही शोध घेतला पाहिजे, असे यावेळी मिटकरी म्हणाले.
अमोल मिटकरींनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, मनसे सैनिकांचा पोलिसांनी शोध सुरू केला. भूमिगत झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी चार पोलीस पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
दरम्यान, या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना विचारणा केली असल्याचे कळते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा