- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
national-tanner-federation-akl: राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे काम प्रत्येक समाज बांधवापर्यंत पोहचविणार - डॉ. प्रतिभा शिरभाते
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्यात गेली दहा वर्षे पासून कार्यरत प्रतिभावान आणि उच्च शिक्षित आणि समाजभान असलेल्या डॉ. प्रतिभा शिरभाते यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब घोलप यांनी डॉ प्रतिभा शिरभाते यांची महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.
या निमित्ताने शनिवारी स्थानिक हॉटेल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. प्रतिभा शिरभाते यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे काम प्रत्येक गावात, तालुक्यातील जिल्हयात, राज्यात सर्व समाज बांधवापर्यंत पोहचविणार असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. प्रतिभा शिरभाते यांनी यावेळी त्यांच्या संपूर्ण कामाचे श्रेय त्यांचे पती भास्कर शिरभाते यांना आणि त्यांचे मुले संकेत आणि कृपाल शिरभाते यांना दिले. कारण घरची साथ असल्याशिवाय पुढे जाण शक्य नाही, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघद्वारा आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलन भोसरी पुणे येथे संपन्न झाले. याच कार्यक्रमात डॉ. प्रतिभा भास्कर शिरभाते यांची महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्षपदी नियुक्ती माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कर देऊन सन्मानित करण्यात आले तसेच नियुक्तीपत्र देऊन अनेक नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
या कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष सरोज बिसुरे ,राष्ट्रीय कार्यध्यक्ष भानुदास विसावे, राष्ट्रीय कार्यध्यक्ष महिला उर्मिला ढाकरे, प्रदेश प्रवक्ता राजेंद्र राजुस्कर, प्रदेश अध्यक्ष माधव गायकवाड, प्रदेश अध्यक्ष महिला मीना भागवतकर, संभा वाघमारे विदर्भ अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत डॉ.प्रतिभा शिरभाते यांना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने आज अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन या नियुक्तीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी रामा उंबरकर,पांडुरंग वाडेकर, मधुकर वानेटकर, जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे, महानगर अध्यक्ष शिवलाल इंगळे, युवा अध्यक्ष सुमित पानझाडे, तालुकाध्यक्ष किशोर काकडे, महासचिव सुनील गवई, शहर उपाध्यक्ष संतोष इंगळे, ज्येष्ठ नागरिक दशरथ महाराज सातपुते, अमोल वानखडे, फॉरेस्ट ऑफिसर भास्कर शिरभाते, गणेश कळसकर, विनोद मराठे, दुर्गा शिवलाल इंगळे, गजानन उंबरकर, ज्येष्ठ नागरिक के टी पद्मने, रामभाऊ शेकोकार तसेच सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन प्रा.रामाभाऊ शेकोकार तर आभार भास्कर शिरभाते यांनी व्यक्त केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा