- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा प्रवक्ता अमोल मिटकरी यांच्यावर काल मंगळवार 30 जुलै रोजी शासकिय विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिकांकडून हल्ल्याचा प्रयत्न आणि त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणात अटक केलेल्या तीन आरोपींचा जामीन अर्ज अटी व शर्तीवर आज न्यायालयाने मंजुर केला आहे.
याप्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांनी 13 जणांविरुद्ध अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या 13 आरोपींपैकी 3 मनसे सैनिकांना पोलिसांनी कालच अटक केली होती. तर एका आरोपीचे निधन झाले. अटक केलेल्या तीन आरोपींना आज अकोला जिल्हा व सत्र न्यायालय येथे हजर केले. दरम्यान मनसे विधी सेल पदाधिकारी वकीलां मार्फत न्यायालयात आरोपींचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. यावर सुनावणी होवून न्यायालयाने तीन तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला. आरोपी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, सौरभ भगत आणि दीपक बोडखे यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.
या प्रकरणात पंकज साबळे, कर्णबाळा दुनबळे, सचीन गालट, अरविंद शुक्ला, ललीत यावलकर, जय मालोकार (मृत), मंगेश देशमुख, सौरभ भगत, रुपेश तायडे, दीपक बोडखे, मुकेश धोंदफडे, गणेश वाघमारे आणि प्रशंसा अंभेरे या मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर BNS, BNSS कायदा अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा