- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
mitkari-car-vandalism-case: आमदार मिटकरी गाडी तोडफोड प्रकरणातील आरोपी जय मालोकार याचे निधन; राज ठाकरे कुटुंबियांच्या भेटीला येणार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : शासकिय विश्रामगृह अकोला येथे आज मंगळवारी दुपारी मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असा वाद रंगला होता. मनसे सैनिकांनी आमदार मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली. या वादानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे सैनिकांविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी 13 मनसे सैनिकांवर गुन्हे दाखल केले. यामधील हल्लेखोर आरोपी जय मालोकर याचा सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे मालोकार कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
आमदार मिटकरी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी 13 मनसे सैनिकांविरोधात सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये जय मालोकार हा एक मनसे कार्यकर्ता होता ज्यांचं नाव या पोलीस तक्रारीत होते. पोलिसांनी तक्रारीनंतर चार पथक गठीत करून हल्लेखोरांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र आरोपी जय मालोकार या मनसे सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संध्याकाळी जय मालोकार याच्या छातीत अचानक दुखू लागले. आणि त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे सुत्रांनी सांगितले.
यानंतर आता पोलिसांनी रुग्णालया जवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मनसे सैनिकांच्या आजच्या गाडी फोड राड्यानंतर अकोला शहरात राजकिय वातावरण तापले आहे.
आरोपींची नावे
पंकज साबळे, कर्णबाळा दुनबळे,
सचीन गालट, अरविंद शुक्ला,
ललीत यावलकर, जय मालोकार,
मंगेश देशमुख, सौरभ भगत,
रुपेश तायडे, दिपक बोडखे, मुकेश धोंदफडे, गणेश वाघमारे, प्रशंसा अंभेरे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा