jay-malokar-cremated-at-nimbi: जय मालोकार यांच्यावर मुळगावी निंबी येथे अंत्यसंस्कार




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेना 

विद्यार्थी आघाडी अकोला जिल्हा उपाध्यक्ष तथा उमरी येथील रहिवासी जय मालोकार यांच्यावर आज त्यांच्या मुळ गावी निंबी (मालोकार) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला मनसे कार्यकर्ते आणि मित्रपरिवारासह नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील त्यांच्या शेतातच अंत्यविधी पार पडला.


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्यावर झालेला काल शासकीय विश्रामगृह येथे झालेला हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडी तोडफोड प्रकरणी जय मालोकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मनसे सैनिकांनी केलेल्या या राड्यानंतर जय मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. 





जय मालोकार यांचा अल्प परिचय 

जय मालोकार हे मनसेच्या विद्यार्थी आघाडीचे विद्यमान अकोला जिल्हा उपाध्यक्ष होते. सध्या परभणी येथे होमिओपॅथी मेडिकल शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारसरणीने प्रभावित होवून ते मागील पाच वर्षांपासून मनसेमध्ये सक्रिय होते.

टिप्पण्या