heavy-rains-hit-akola-district: संततधार पावसाचा फटका: चोहट्टा बाजार जवळील मुख्य रस्त्याच्या बाजूचा भराव खचला, दुरुस्तीचे काम सुरू





ठळक मुद्दा 

*माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर यांनी तात्काळ घेतली दखल


*अधिकारी लागले कामाला




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: संततधार पावसामुळे अकोट - अकोला मार्गावरील चोहोटा बाजार जवळच्या शहानूर नदी नजीकच्या मुख्य रस्त्याच्या बाजूचा भराव खचल्याची घटना काल सकाळी घडली.मुंबई येथे विधिमंडळ पावसाळी अधिवशनासाठी गेलेल्या आमदार रणधीर सावरकर यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी  तात्काळ दखल घेवून, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या रस्त्याच्या दुरुस्तीचे निर्देश दिले. 


आमदार सावरकर यांच्या निर्देशानंतर  सबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जावून भरावाच्या दुरस्तीच्या कामास सुरवात केली.


कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडून नये व नागरिकांना कुठल्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये याची दक्षता आमदार सावरकर यांनी घेतल्याने जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

टिप्पण्या