gleneagles-hospital-mumbai : मुंबईच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये विदर्भातील 10 पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी यकृत प्रत्यारोपण

पत्रकार परिषदेला उपस्थित मान्यवर 




ठळक मुद्दा 

यकृताच्या विकाराने पिडीत रुग्णांकरिता ठरतोय आशेचा किरण






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत विदर्भातील 10 पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजाराशी झुंज देणाऱ्या या रुग्णांवर नवी आयुष्य मिळवून देण्यात रुग्णालयाला यश आले आहे. हे रुग्ण आता कोणत्याही गुंतागुंतीशिवाय सामान्य जीवन जगत असल्याची माहिती शनिवारी अकोला येथील होटेल सेंट्रल प्लाझा येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.


भारतात यकृताचे आजार वाढत आहेत, त्यामुळे यकृत प्रत्यारोपणाची मागणी वाढली आहे. या प्रत्यारोपणामध्ये जिवंत किंवा मृत दात्याकडून मिळालेले यकृताचे प्रत्यारोपण केले जाते. चूकीची जीवनशैली, अति मद्यपान, लठ्ठपणा आणि हिपॅटायटीस बी आणि सी चे संक्रमण हे यकृताच्या विकारास कारणीभूत ठरत आहेत. अवयवदानाबाबत जागरुकतेच्या अभावामुळे अनेक रुग्णांना प्राप्तकर्त्यांच्या प्रक्षितेत थांबावे लागते तर काहींना विलंब झाल्याने आपला जीव देखील गमवावा लागतो. गेल्या वर्षभरात, अकोला आणि अमरावती येथील यकृताच्या शेवटच्या टप्प्यातील आजार असलेल्या 10 रुग्णांवर परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आले आहे.


डॉ. गौरव चौबळ (संचालक - यकृत, स्वादुपिंड, आतडे प्रत्यारोपण कार्यक्रम आणि एचपीबी शस्त्रक्रिया ग्लेनईगल्स हॉस्पिटल्स, परळ, मुंबई) सांगतात की, यशस्वी प्रत्यारोपण हा त्या रुग्णांसाठी एक परिवर्तन घडवून आणणारा प्रवास आहे. ग्लेनईगल्स हॉस्पिटल्समधील प्रगत वैद्यकीय सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रे तसेच रोबोटिक- असिस्टेड प्रक्रियेचावापर करुन शस्त्रक्रियेतील गुंतागुंत कमी केली जाते आणि रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी झाला आहे. रुग्णांना निरोगी आयुष्य जगता यावे हेच आमचे मुख्य ध्येय्य आहे.


डॉ उदय सांगलोडकर (वरिष्ठ सल्लागार हेपॅटोलॉजिस्ट आणि वैद्यकिय प्रमुख - लिव्हर आणि ट्रान्सप्लांट आयसीयू, ग्लेनईगल हॉस्पिटल्स, परळ, मुंबई) सांगतात की, वरील 10 रुग्णांना यकृताच्या गंभीर आजाराचे निदान झाले होते आणि प्रत्यारोपणापूर्वी त्यांची प्रकृती गंभीर होती. बहुतेक प्रकरणांमध्ये व्हायरल हेपेटायटीस बी आणि सीचा संसर्ग होता आणि काहींना दीर्घकालीन मधुमेहामुळे फॅटी लिव्हरची समस्या होती. या रुग्णांना जलोदर, कावीळ आणि वारंवार रुग्णालयात दाखल होण्यासारख्या गुंतागुंतीचा अनुभव आला. सुरुवातीच्या टप्प्यातील यकृत समस्या औषधोपचाराने व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात, परंतु दीर्घकालीन उपचार उपलब्ध नव्हते त्यामुळे यकृत प्रत्यारोपण करणे अत्यंत गरजेचे होते.


डॉ सांगलोदकर पुढे सांगतात की यकृत प्रत्यारोपणाचे दोन मुख्य प्रकार आहेत. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे मृत दात्याचे यकृत प्रत्यारोपण (DDLT) आणि दुसरा प्रकार म्हणजे जिवंत दात्याचे यकृत प्रत्यारोपण (LDLT). पहिल्या प्रकारामध्ये जास्त मागणीमुळे रुग्णाला सरकारी यादीच्या प्रतिक्षेत रहावे लागते , तर दुसऱ्या प्रकारामध्ये जीवंत दाता त्याच्या यकृताचा काही भाग दान करतो जो 2 महिन्यांत सामान्य आकारात पुन्हा निर्माण होतो. प्रत्यारोपणानंतर प्राप्तकर्ते लवकर बरे होतात. बहुतेकांना शस्त्रक्रियेनंतर 7-10 दिवसांत घरी सोडले जाते.


अकोल्यातील पोट विकार तज्ज्ञ,  डॉ. आशिष तापडिया सांगतात की, यकृताचा गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर  वेळीच प्रत्यारोपण व्हावे जेणेकरुन त्यांना चांगले आयुष्य जगता येईल आणि याकरिता प्रत्यारोपण वेळेवर व्हावे हे माझे ध्येय आहे.


परळच्या ग्लेनईगल हॉस्पिटल्सच्या माध्यमातून आम्ही विदर्भातील रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टिम याठिकाणी कार्यरत असून येथील रुग्णांना उच्च दर्जाची सेवा पुरविण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या दारापर्यंत मेट्रोपॉलिटन हेल्थकेअरची सुविधा उपलब्ध करुन देताना आम्हाला आनंद होत असल्याची प्रतिक्रिय डॉ विवेक तलौलीकर( सीओओ ग्लेनेगल्स हेल्थकेअर इंडिया) यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या