breaking-news-voter-card-id अफगाणच्या नागरिकाकडे आढळले भारतीय मतदान कार्ड; अकोल्यात दोघां विरूद्ध गुन्हा दाखल






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अफगाण देशातील नागरिक असलेल्या दोघांकडे भारतीय मतदान ओळखपत्र आढळल्याने अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. अफगाणच्या नागरिकांनी भारतीय मतदान कार्ड ओळखपत्र बनविल्याने त्यांचे विरूध्द कलम 318(4), 336 (3), 337,339, 3 (5) भारतीय न्याय संहीता 2023 सहकलम 13(1) विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 प्रमाणे आज अकोला पोलिसांनी कार्यवाही केली  आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हा विशेष शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला येथे विदेशी विभागामधील सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनिल धामोडे यांनी पोलीस स्टेशन रामदासपेठ हददीत राहणारे अफगाण नागरीक अमजद लुअंग खान व परवीन लुअंग खान यांचा दीर्घ मुदत वाढ व्हिसा मंजुरी करीता अर्ज भरण्याकरीता कार्यालयात बोलाविले होते. यावेळी त्या अफगाण नागरिकांकडे असलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, त्यांचे कडे भारतीय निवडणुक आयोगाचे मतदान कार्ड मिळुन आले. 


अफगाण नागरीक अमजद लुअंग खान व परवीन लुअंग खान हे भारताचे नागरीक नसतांना त्यांनी भारतात वास्तव्य करण्याकरीता भारतीय निवडणुक आयोगाचे मतदान कार्ड तयार केले. याकरीता अफगाण नागरीक  अमजद लुअंग खान व परवीन लुअंग खान यांचे विरुध्द कलम 318 (4), 336 (3), 337, 339, 3 (5) भारतीय न्याय संहीता 2023 सहकलम 13 (1) विदेशी व्यक्ती अधीनियम 1946 प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.


ही कार्यवाही पोलीस अधिक्षक  बच्चन सिंह ,अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे , उप विभागीय पोलीस अधिकारी सतिष कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज बहुरे, सहायक पोलीस निरीक्षक के. डी. पवार, पोलीस कॉन्स्टेबल अतुल यांनी केली आहे.



टिप्पण्या