- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
दिल्ली: देशभरात आज 1 जुलै पासून नवा कायदा लागू झाला आहे. ब्रिटीश काळात बनवलेल्या फौजदारी कायद्याच्या जागी 3 नवीन कायदे अस्तित्वात आणले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा आजपासून देशभरात लागू झाला आहे. या कायद्याअंतर्गत देशातील पहिला एफ आय आर दिल्लीत दाखल झाला असून, BNS 2023 Section 285 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिल्लीच्या कमला मार्केट येथील पोलीस ठाण्यात हा पहिला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व दाखल केलेल्या एफआयआर नुसार एसआय कार्तिक मीणा यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सब इन्स्पेक्टर कार्तिक हे नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनजवळील फूटपाथजवळ गस्तीवर असताना डीलक्स प्रसाधन गृहजवळ पोहोचले. येथे एक इसम सार्वजनिक रस्त्यावर ठाण मांडून बसला होता आणि विडी, सिगारेट, पाणी विक्री करीत होता. यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता. हे पाहून एसआय कार्तिक यांनी त्या इसमाला हटकले. रस्त्यातून स्टॉल बाजूला करण्यास सांगितले. मात्र आपण हतबल आहोत. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, असे म्हणून स्टॉल मालक तिथून निघून गेला. यानंतर इन्स्पेक्टर यांनी स्टॉल धारकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
आता एफआयआर नव्या पद्धतीने लिहिली जाणार आहे. नवीन कायद्यानुसार ती बीएनएस अंतर्गत लिहावी लागेल. नव्या कायद्यानुसार दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरची प्रत समोर आली. भारतीय न्याय संहिताच्या कलमाअंतर्गत रात्री 12 वाजल्यानंतर सर्व प्रकरणातील एफआयआर दंड प्रक्रिया संहिता म्हणजेच सीआरपीसीऐवजी भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजेच बीएनएसएसच्या कलम 173 अंतर्गत घेतली जात आहे.
IPC मध्ये एकूण 511 तर BNS मध्ये 358 कलमे आहेत. आयपीसीच्या सर्व तरतुदी भारतीय न्यायिक संहितेत संक्षिप्त केल्या आहेत. आयपीसीच्या तुलनेत BNS मध्ये 21 नवीन गुन्ह्यांची भर पडली आहे. 41 गुन्ह्यांमध्ये तुरुंगवासाची मुदत वाढवण्यात आली आहे. 82 गुन्ह्यांमध्ये दंडाच्या रकमेत वाढ झाली आहे. 25 गुन्हे असे आहेत ज्यात किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सहा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी समाजसेवा करावी लागणार आहे. तर 19 कलमे काढण्यात आली आहेत. नवीन गुन्हेगारी कायद्यांतर्गत कुठूनही गुन्हा नोंदवू शकतो. FIR देखील ऑनलाइन नोंदवू शकतो. यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. झिरो एफआयआर सुरू करण्यात आला असून त्याद्वारे कोणीही कोणत्याही पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवू शकतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा