bhartia-burglary-case-akola: बहुचर्चित भरतीया घरफोडी प्रकरण: मुख्य सुत्रधार बिहार राज्यातुन अटक; 25 लाख रुपयेचा मुददेमाल हस्तगत






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बहुचर्चित भरतीया घरफोडी प्रकरणामध्ये अखेर 78 दिवसांचे अथक परिश्रमानंतर मुख्य सुत्रधार बिहार राज्यातुन अटक करण्यात अकोला पोलिसांना यश मिळाले आहे.

गुन्हयातील बहुमुल्य हि-याचे नेकलेस सह अंदाजे 25 लाख रुपयेचा मुददेमाल आरोपी कडून हस्तगत करण्यात आला आहे. मुद्दे‌मालसह घरफोडीतील हत्यार  कटर आरोपी कडुन प्रयागराज मधुन पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती आज मंगळवारी निमंत्रित पत्रकार परिषदेत देण्यात आली.


भरतीया घरफोडी प्रकरणी 04 मे 2024 रोजी खदान पोलीस स्टेशन येथील अपराध क्रमांक 385/24 कलम 457, 380 भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल असून तपासावर आहे. या गुन्हयातील घरफोडी मध्ये सोने, चांदी तसेच रोख असा एकुण 43 लाख 77 हजार 317 रूपयाची चोरी झाली होती. गुन्हयाच्या घटनास्थळी पोलीस अधीक्षक अकोला यांनी लेखी व तोंडी आदेश देवुन, गुन्हयात उघडकीस आणण्यासाठी आदेशीत करून सुचना दिल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सांगितले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरिक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरिक्षक आशिष शिंदे व स्थानिक गुन्हे शाखा येथील त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळाचे आजुबाजुचा परीसराची पाहणी केली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून गोपनिय माहितीचे आधारे गुन्हया घडल्या नंतर 48 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाख पथकाने आरोपी निष्पन्न करून अहमदनगर जिल्हयातुन आरोपी जिगर कमलाकर पिंपळे (वय 37 वर्ष रा. पाखोरा, ता. गंगापुर, जि. संभाजी नगर) यास ताब्यात घेवुन अटक केली होते. त्यानंतर आरोपी  सुनिल विठठल पिंपळे (वय 50 रा गुरू धानोरा ता. गंगापुर जि.छ. संभाजी नगर) यास अटक करण्यात आली होती. केलेल्या तपासात पथकाला या गुन्हयातील मुख्य आरोपी विवेक उर्फ चावल्या कमलाकर पिंपळे (वय 40 वर्ष रा. ग्राम वझर ता गंगापुर जि. छ. संभाजी नगर) हा असल्याचे निष्पन्न झाल्याने व सदर गुन्हयातील सोने व डायमंड या दागिन्याची त्याने विक्री केल्या बाबत माहीती प्राप्त झाल्याने, त्यास अटक करणे कामी पोलीस निरिक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी या गुन्हयातील मुख्य फरार आरोपी याचा शोध घेवुन, गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करणेसाठी पोलीस उपनिरिक्षक गोपाल जाधव व पोलीस अमलदार पथक गठीत केले. त्यानंतर या पथकाने  गुन्हयाचा तपास करून तांत्रीक बाबीचा व गोपनीय माहीतीचे आधारे गुन्हयातील मुख्य आरोपी विवेक उर्फ चावल्या कमलाकर पिंपळे (वय 40 वर्ष रा. ग्राम वझर ता गंगापुर जि.छ. संभाजी नगर) यास बिहार राज्यातुन अटक करून, गुन्हा करते वेळी वापरेलेले हायड्रोलीक कटर, टामी, मोठे पेचकस व इतर साहीत्य तसेच गुन्हयातील चोरी गेलेला मुददेमाल पैकी 25 लाख रूपयेचा मुददेमाल हस्तगत केले.


असा केला तपास 


पथक हे गुन्हयातील आरोपी शोध कामी गुन्हा घडल्यापासुन सलग 78 दिवस गुन्हा उघडकीस आणणे करीता परीश्रम घेत होते.


तपास पथक हे आरोपी शोध करीता 03 राज्य (बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश) जावुन आरोपीचा शोध घेतला.


या गुन्हयात तपास पथकाने आरोपी शोध कामी 05 राज्यात एकुण 7 हजार किलो मीटरचा प्रवास केला.


तपास पथकाने आरोपी शोध कामी मध्यप्रदेश मधील विदिशा, छनेरा, खंडवा, तसेच बिहार मधील आरा, पुनपुन व उत्तर प्रदेश मधील प्रयागराज व कौश्यबी जिल्हयात शोध घेण्यात आला.


या गुन्हयात कोणताही पुरावा उपलब्ध नसतांना तसेच आरोपीने मोबाईल व वाहनाचा वापर न करता सुध्दा क्लिस्ट गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडुन आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणला.


या गुन्हयात अंदाजे 25 लाख रूपयेचा मुददेमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकाला यश आले.


गुन्हयाचा तपास पुढील तपास सुरू आहे.


आरोपी कडून मुद्देमाल जप्त


तपास पथकाने गुन्हयात  एक सोन्याची अगंठी डायमंड सह वजन 4 ग्रॅम, दोन सोन्याचे कानातले जोड डायमंड सह वजन 3 ग्रॅम,  दोन सोन्याचे कानातले जोड डायमंड सह वजन 8 ग्रॅम, एक सोन्यासारखा नेकलेस 3 डायमंडसह वजन अंदाजे 18 ग्रॅम,  एक सिल्व्हर रंगाचा नेकलेस मोठया डायमंड सह वजन अंदाजे 15 ग्रॅम,  एक सोन्याची लगड अंदाजे 238 ग्रॅम असा एकुण 25 लाख रूपयेचा मुददेमाल यातील मुख्य आरोपी कडुन जप्त करण्यात आले.



यांनी केली कारवाई 

ही कार्यवाही पोलीस अधिक्षक  बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर गुटट्टे, पोलीस उप निरिक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरिक्षक आशिष शिंदे सह अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, रविद्र खंडारे, गोकुळ चव्हाण, खुशाल नेमाडे, वसीमोद्दीन, राहूल गायकवाड सर्व स्थानिक गुन्हे शाखा अकोला तसेच सायबर सेलचे आशिष आमले, गोपाल ठोंबरे व चालक प्रशांत कमलाकर तसेच पोलीस मुख्यालय येथील सिमा ढोणे तसेच दहशतवादी विरोधी पथक जालनाचे विनोद गर्डे यांचे सहकार्य लाभले.


टिप्पण्या