akola-police-recruitment-rain: संततधार पावसाचा फटका अकोला पोलीस भरती प्रक्रियेवर; आजच्या चाचणी होणार परवा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोल्यात पावसाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेवर ही बसला आहे. अकोला पोलीस दलात 195 पोलीस शिपाई पदासाठी 19 जुन पासून भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र दोन दिवसांपासून अकोल्यात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे कालची आणि आज होणारी पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.


काल 1154 महिला उमेदवारांची  पोलीस मुख्यालय अकोला येथे मैदानी चाचणी होणार होती. मात्र मैदानात पाणी साचलेले असल्याने काल होणारी महिला उमेदवारांची चाचणी आता 11 जुलै रोजी सकाळी 5 वाजता घेण्यात येणार आहे. तर 1000 पुरुष उमेदवारांची चाचणी 22 जून रोजी आलेल्या पावसामुळे पुढे 9 जुलैला ढकलण्यात आलेली चाचणी देखील आता 11 जुलैला सकाळी 9 वाजता घेण्यात येणार आहे.


अकोला जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेत  आज पुरुष किवा महिला उमेदवार यांची  फ्रेश (सुरुवात) मैदानी चाचणी नव्हती. परंतु भरती प्रक्रियेच्या नियत  वेळापत्रक प्रमाणे ज्या 1000 पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी 22/06/2024 रोजी होती, ती त्यादिवशी आलेल्या पाऊसामुळे आज 09/07/2024 रोजी ठेवण्यात आली होती. परंतु आज  09/07/2024 रोजी सकाळी परत आलेल्या पाऊसामुळे त्यांची  तसेच ज्यांना काही कारणास्तव 09/07/24 ही तारीख देण्यात आली होती. त्या उमेदवारांची सदर चाचणी पुढे ढकलण्यात आली असून, ती  11/07/2024 रोजी सकाळी 09.00 वाजता ठेवण्यात आलेली आहे.


काल 8/7/24 रोजी पावसा मुळे अडथळा आलेल्या 1154 महिला उमेदवार यांना देखील 11/7/24 तारीख देण्यात आली असून, त्यांची वेळ मात्र सकाळी 5.00 ची देण्यात आली आहे. याची सर्व उमेदवार यांनी कटाक्षाने नोंद घ्यावी, असे आवाहन अकोला पोलीस विभागाने केले आहे.





          




टिप्पण्या