akola-police-recruitment-2024: अकोला पोलीस भरती प्रक्रिया: 2310 उमेदवारांनी दिली लेखी परीक्षा





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोल्यात पोलीस दलात भरती करिता १९ जून पासून प्रक्रिया सुरु झाली होती. या भरतीकरीता एकुण २१८५३ उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरले होते. यामध्ये १६१६१ पुरुष उमेदवार, ५६९१ महिला उमेदवार तसेच ०१ तृतीयपंथीचा समावेश होता. मैदानी चाचणी पार केलेल्या आणि गुणवत्तेच्या आधारावर आज या उमेदारांची अकोला शहरातील चार केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. सुमारे १५ हजार उमेदवारांनी शारीरिक आणि मैदानी चाचणी दिली होती या पैकी ६२३० उमेदवार उत्तीर्ण झाले होते.





यापैकी आज २३८४ पैकी २३१० महिला आणि पुरुष उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. ७४ उमेदवार गैरहजर होते. या संपूर्ण परीक्षा केंद्राचा परीसर सिसिटीव्हीच्या निगराणीखाली होता. 





लेखी परीक्षेकरिता उमेदवारांकडे पेन, पेन्सील, खोडरबर, घडयाळ, मोबाईल, ब्लुटुथ, बटन कॅमेरा किंवा इतर इलेक्ट्रॉनीक साधने परीक्षेच्या वेळी सोबत ठेवण्यांस बंदी घालण्यात आली होती. लेखी परीक्षेच्या वेळी उमेदवार कॉपी अथवा गैरप्रकार करण्यासाठी वरील वस्तुंचा वापर करत असल्यास अथवा एखादा डमी उमेदवार आढळल्यास त्यांचेविरुध्द कायदेशिर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता.



टिप्पण्या