thunderstorms-akola-rains: अकोल्यात वादळीवारा, ढगांच्या गडगडाटासह बरसल्या पाऊसधारा




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: वादळी वारा, ढगांचा गडगडाट सह आकोल्यात आज गुरुवारी सायंकाळी पाऊसधारा बरसल्या.   मान्सूनपूर्व या पावसाच्या आगमनाने प्रचंड तापमान सहन करणारे अकोलेकर सुखावले आहेत. 



अकोल्यात आज सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मान्सून पूर्व बरसणाऱ्या या पावसाने उकाड्या पासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वादळी वारा आणि पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.






आज जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सुद्धा मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. सुमारे पंधरा मिनिट सुरू असलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली होती. 



अचानक सुरू झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अकोला शहरातील खुले नाट्यगृह जवळील लावलेलं मोठे जाहिरात होर्डिंग वाकले. 






टिप्पण्या