- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
theft-case-suspected-accuse: आळशी प्लॉट येथील जबरी चोरी प्रकरण; आरोपींची स्केच जारी, माहिती देणाऱ्यास बक्षीस
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व खदान पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या न्यू आळशी प्लॉटमधील व्यवसायिक नवल केडिया यांच्या घरी २७ जूनच्या रात्री जबरी चोरीची घटना घडली होती. या प्रकरणातील संशयित अज्ञात आरोपींचा कसून शोध सुरू असून, आज पोलिसांनी दोन अज्ञात संशयित आरोपींची रेखाचित्र (sketch) जारी केले आहेत. या संशयित आरोपींची माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस पोलीस विभागाकडून देण्यात येणार आहे.
जिल्हा अकोला पोलीस घटकातील पोलीस स्टेशन खदान अंतर्गत अपराध क्रमांक ५२१ / २४ कलम ४५२ ३९२ ३९७ ३४ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार नवल केडीया यांच्या तक्रारीनुसार २७ जूनला रात्री अंदाजे ११ वाजता त्यांचे घरात ०४ अज्ञात ईसम घुसले. केडीया यांना चाकुचा व बंदुकीचा धाक दाखवुन त्यांचे घरातुन जबरी चोरी करुन नगदी व सोन्या – चांदीचा ऐवज असा एकुण रुपये ५७, ००० /- हजाराचा मुद्देमाल इसमांनी चोरुन नेला.
तपासामध्ये नवल केडिया यांनी अज्ञात इसमांच्या दिलेल्या वर्णनाप्रमाणे दोन रेखाचित्र (स्केच) तयार करण्यात आले. स्केचमधील वर्णनासारख्या अज्ञात ईसम आपल्या आजु बाजुला अथवा परीसरात आढळुन आल्यास, खदान पोलीस स्टेशन येथे माहीती देण्यात यावी .हे स्केच सार्वजनीक माध्यमांवर जास्तीत जास्त प्रसारीत करण्यात यावी. चित्रात वर्णनाची ईसमांची माहीती देणा-या माहीतगाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येवून, त्यांना योग्य ते बक्षिस देण्यात येईल. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव हे गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन जनतेस खदान पोलिसांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पोलीस स्टेशन खदान, (जिल्हा अकोला) येथे
गजानन धंदर, पोलीस निरीक्षक, पोलिस स्टेशन खदान मो. क्रमांक ९८२३२३६०३४, निलेश करंदीकर, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन खदान, मो. क्रमांक ८९९९१३२६२६ यांच्याशी संपर्क साधावा.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा