special-cleanliness-campaign: मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने राबविली विशेष स्वच्छ्ता मोहिम





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: मनपा प्रशासनाव्दारा आयोजित विशेष स्वच्छ्ता मोहीमेंतर्गत आज शहरातील विविध भागातील परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभागी होवून शहरातील विविध भागाची सखोल स्वच्छ्ता केली.



अकोला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये अकोला शहरातील वर्दळीच्या, गर्दीच्या ठिकाणी तसेच शहरातील ज्या भागात जास्त प्रमाणात अस्वच्छता आहे, अशा भागांमध्येे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मनपा अधिकारी कर्मचारी, सामाजिक संघटनांचे सदस्य, अशासकीय संस्थांचे सभासद, एन.सी.सी. व एन.एस.एस.चे विद्यार्थी, बचत गट, वस्ती  स्तर संघ यांच्या सहभागाने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले होते.    




         

त्या अनुषंगाने आज शनिवार  १ जून रोजी सकाळी 6 ते 8 वाजेदरम्यान मनपा अधिकारी कर्मचा-यांव्दारे अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रतनलाल प्लॉट, आंबेडकर नगर, एल. आय.सी.ऑफिसचा भाग, टॉवर चौक, महसूल कॉलनी, पत्रकार कॉलनी, जिल्हाे मध्ययवर्ती बँक, आरएलटी कॉलेज समोरील रस्ता, सिव्हील लाईन चौक व परिसर, न्यू बस स्टॅण्ड, रायजिंगसन होटल मागील भाग, शुभकर्ता लॉन जवळील भाग आदी भागात विशेष स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली. 




विशेष स्वच्छता मोहीमेंतर्गत या भागातील रस्ते, नाल्या आणि परिसरांची सखोल स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच स्वच्छता झाल्यानंतर या भागातील सर्व नाल्यांमध्ये डास अळी नाशक औषधीची फवारणी करण्यात आली आहे.  





या विशेष स्वच्छता मोहिमेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सनिल लहाने, मनपा उपायुक्त गीता ठाकरे, डॉ.मेघना वासनकर, शहर अभियंता नीला वंजारी, सहा. संचालक नगर रचना आशिष वानखडे, मनपा प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे, सहा.आयुक्त विजय पारतवार, विठ्ठल देवकते, दिलिप जाधव, देविदास निकाळजे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय ठोकळ, मनपा शाळांचे सर्व मुख्याध्यापक यांचेसह मनपातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी, एन.सी.सी.चे विद्यार्थी, महिला बचत गट यांनी सहभाग नोंदविला आहे. 



मनपा आयुक्तांचे आवाहन 



   

“अकोला शहरातील नागरिकांनी आपल्याल घरात किंवा प्रतिष्ठाननात निघणारा ओला व सुका कचरा वेग-वेगळा गोळा करून शहरात व परिसरात इतरत्र तसेच नाली, नाल्यात न टाकता फक्त मनपाच्या कचरा घंटा गाडी मध्येच कचरा टाकावा. तसेच शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टीकने बनलेल्या वस्तूंंचा वापर, विक्री व हाताळणी पुर्णपणे बंद करावा.” 

-डॉ.सुनिल लहाने 

मनपा आयुक्त तथा प्रशासक

टिप्पण्या