- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
reserved-water-in-vaan-project: अकोला शहरासाठी वाण प्रकल्प मधील आरक्षित पाण्यावरील स्थगनादेश हटवा; राजेश मिश्रा यांची पत्रकार परिषदेत मागणी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील नागरिकांना लागणारे पाणी महान धरणातील कमी पडत असल्याने शेजारील बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पतील पाणी आरक्षित करण्यात आले. मात्र आपल्याच जिल्ह्यातील वाण प्रकल्प मधील वाण नदीतील पाणी हे पहाडातून येते . कोणत्याही एमआयडीसी किंवा नाल्या, नद्यामधून येत नाही. त्यामुळे हे पाणी पिण्यास योग्य आणि शुद्ध आहे. तरीही भविष्यात लागणारे पाणी नियोजन करण्यासाठी जिगाव प्रकल्प मधून पाणी आरक्षित केले आहे. त्यामुळे शहरातील जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून वाण धरणातील पाणीसाठा उपलब्ध असून त्यावर आताचे सत्ताधारी पक्षाचे आणि २०१९ मध्येही सत्ताधारी मुख्यमंत्री, आमदार,खासदार आणि पालकमंत्री यांनी वाण प्रकल्प मधून पाणी साठी स्थगनादेश दिला होता तो आतातरी हटविण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उबाठाचे शहर अध्यक्ष राजेश मिश्रा यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.
महानगर पालिकेच्या सभेत ऑगस्ट २०१९ मधे वाण धरणातून पाणी आरक्षित केले होते. मात्र ३१ सप्टेंबर २०१९ ला स्थगित करण्यासाठी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी स्थगितीची मागणी केली होती. ती मागणी मान्य करून तत्कालीन मुख्यमंत्री यांनी स्थगनादेश दिला होता. वाण नदी आपल्याच जिल्ह्यात असून वाण नदीत वाहणारे पाणी हे पूर्णतः केवळ पहाडा मधून वाहून येते. यामध्ये कोणतेही दूषित पाणी मिसळत नाही. त्यामुळे वाण मधील पाणी १०० टक्के शुद्ध पाणी आहे. असे पाणी उपलब्ध असूनही अमरावती जिल्ह्यातुन वाहून येणारी पूर्णा नदी मध्ये एम आय डी सी मधील दूषित घाण पाणी, नदी, नाल्यामधील सांडपाणी वाहून येते. तेच पाणी शेजारील बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प मधून आरक्षित केल्याचा दिंडोरा पिटल्या जातो. मात्र वास्तवात शुद्ध पाणी असूनही आणि सत्ताधारी आपणच असतानाही केवळ दिलेला स्थगनादेश हटविण्याची गरज आहे. तो स्थगनादेश हटवावा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे शहर अध्यक्ष राजेश मिश्रा यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.
यावेळी राहुल कराळे, तरुण बगेरे, मंगेश काळे, गजानन बोराळे, पंकज जायले, प्रमोद धर्माळे, अनिल परचुरे ,आशुतोष मिश्रा ,रवी मडावी ,योगेश गीते ,चेतन मारवाल व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा