- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
rescue-operation-in-deep-well : अचानक टाइल्स खचल्याने बाप लेक पडले 20 फुट खोल विहिरीत; तीन तासाच्या बचाव कार्याला आले यश, दोघेही सुखरुप बाहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील गौरक्षण मार्ग स्थित साई बाबा मंदिर परिसरातील कोरड्या विहीर जवळील टाइल्स खचकल्याने बाप व लेक विहिरीत पडल्याची दुर्दैवी घटना काल गुरूवार रात्री नऊ साडे नऊ वाजताच्या दरम्यान घडली. तीन तासाच्या अथक प्रयत्ना नंतर बाप लेकीस सुखरूप बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले.
शहरातील एका महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक योगेश अग्रवाल आणि त्यांची 3 वर्षाची मुलगी साईबाबा मंदिर परिसरातील विहिरी जवळील ओट्यावर बसले होते. या विहिरीवर लोखंडी जाळी लावण्यात आलेली आहे. मात्र अचानक टाईल्स खाचकल्या आणि दोघेही सुमारे 20 फूट खोल विहिरीत पडले.
घटनास्थळी पोहचून प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले. सुरवातीला या बचाव कार्यात 3 वर्षीय मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालं. यानंतर योगेश अग्रवाल यांना बाहेर काढण्यासाठी या विहिरीवरील लोखंडी जाळी कापून शर्थीचे प्रयत्न करून तब्बल 3 तासा नंतर बाहेर काढण्यात यश मिळालं.
या घटनेत अग्रवाल यांना किरकोळ दुखापत झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा