- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
rescue-operation-bull-fell-well: चार फुट अरुंद अन् चाळीस फुट खोल विहिरीत पडला वळू; पाच तास चालले रेस्क्यू ऑपरेशन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: पिंजर येथील चार फुट अरुंद चाळीस फुट खोल विहिरीतून येथीलच मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या रेस्क्यु टीमने वळुला रेस्क्यु करुन जिवनदान दिले.
बाहेर काढल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वळुला जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी सीपीआर व प्रथमोपचार उपचार करून उठून उभे केले. कार्यवाही यशस्वी होताच उपस्थित नागरिकांसह महीलांनी हर हर महादेवाचा गजरच केला. ही विश्वास न बसणारी अशी प्रक्रिया उपस्थितांना प्रथमच पाहायला मिळाली.
मानव सेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या रेस्क्यु टीमची विशेष धाडसी कामगीरी जिद्द कसोशी व कल्पकतेतून पाच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर शेवटी उपस्थितांना न पटणारे व कोणत्याच परीस्थीतीत हे शक्य नसणारे रेस्क्यु ऑपरेशन यशस्वी केले.
रविवारी सकाळी 9:00 वाजता पिंजर शहरातील वार्डा क्रमांक 2 मधील विहरीत मोठा नंदी (वळु) पडल्याची माहीती ब-याच नागरीकांनी येथीलच मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांना दिली. क्षणाचाही विलंब न करत वायर रोप सेटप, सेप्टी बेल्ट्स,रॅम्प,होर्नेक्स, सीट बेल्ट,राॅड, कॅराबिनर, फीगर येठ, हेल्मेट टॉर्च घेवून आपले सर्व गावातील सहकारी घटनास्थळावर बोलावून घेतले. दहा मिनटात 50 ते 70 सहकारी हजर झाले. घटनास्थळ ट्रेस केले असता विहीर ही 40 फुट खोल आणि 4 फुट अरुंद होती. अन त्यातही कपारी. यात फसलेला वळु पाहता कोणत्याच परीस्थीतीत काढण शक्य नव्हते. तेही जिवंत तर बिलकुलच नाही. यात जिवरक्षक दिपक सदाफळे यांचा आपत्ती व्यवस्थापनाचा 25 वर्षांचा दांडगा अनुभव असल्याने जिद्द कसोसीने कल्पकतेतून शेवटी पाच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर वळुला जिवंत व तेही सुखरूप बाहेर काढलेच. बाहेर काढल्यानंतर तो नंदी कुठली हालचाल न करता बेशुद्ध अवस्थेत होता. पण जिवरक्षक दिपक सदाफळे हे सीपीआर व प्रथमोपचार उपचारात अतिशय एक्सपर्ट असल्याने त्यांनी वळुला सीपीआर चार प्रकारची आपली स्टेप वापरून CPR चालु केले. नंतर वळुला रिकव्हर पोजिशनवर घेतले. आणी नंतर थंडगार पाण्याने हेड कुलिंग केले. यानंतर चार प्रेशर पाॅईन्ट देऊन पुन्हा CPR चालुच ठेवले. यात कार्यवाहीत चक्क वळु ऊठुन चालायला लागला. तेव्हा उपस्थित नागरिकांसह महीलांनीही हर हर महादेवचा गजर केला. आत मधे जाणे सुद्धा शक्य होत नव्हते. होर्नेक्स लावुन आकाश मनवर याला चार ते पाच वेळा खाली पाठवुन बॅकअप करायचे प्रयत्न केले. परंतु काहीच करता येत नव्हते. वळूचे चारही पाय खाली आणी स्पेस कमी असल्याने बुडात वळु पॅक झाला होता, असे विचित्र व अडीअडचणीचे ऑपरेशन शेवटी पथकाने यशस्वी केलेच. वळुसह कोणालाही दुखापत होणार नाही आणी यामुळेच एखादी दुसरी दुर्घटना होणार याची मात्र जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी पुरेपूर तंतोतंत विशेष काळजी घेतली. कारण वळुला सहा वायररोपनी बॅकपॅक केलेले होते. आणी चार मानविय साखळ्या करुन वळुला वर ओढण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अशावेळेस वळु अर्ध्यावर आल्यानंतर वजन कॅपिसीटीची आणी बॅलेंस लक्षात घेता पुर्ण वायररोपला जोरदार प्रेशर आलेले असते. यामुळे रोप घासला किंवा एकदोन तुटले तर खुप मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते. हेच संभाव्य धोके लक्षात घेऊन दिपक सदाफळे हे टेक्निकली बारीकसारीक पाॅईन्ट सह सहभागी प्रत्येकांकडे बारकाईने लक्ष ठेवून होते. आधीच सर्वांनाच सदाफळे यांनी इंट्रकशन्स देऊन अवगत केले होते.
या यशस्वी ऑपरेशनचे मोठे आज समाधान वाटत आहे. या रेस्क्यु आपरेशन मधे पथकाचे जवानांसह विशेष गावातील तरुणांनी नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. विठ्ठल वडुरकर यांनी स्वता हजर राहुन जेसीबी उपलब्ध करून दिली. ट्रॅक्टरसह संतोष विभुते, योगेश विभुते हजर झाले. राधेश्याम सारस्कर यांनी चैन ब्लॉक आणुन दिला, असे सर्वांचे सहकार्य लाभले. यावेळी रमेश खोबरे, माजी सरपंच अशोक लोणाग्रे, शाम देशमुख हजर होते, अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा