rain-update-news-akola-city: पावसाने केली अकोल्यातील विकास कामांची पोलखोल; उड्डाणपुलावर साचले पाणी

 





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोल्यात आज सायंकाळी मान्सून पूर्व बरसलेल्या जोरदार पावसाने लोकांची चांगलीच तारांबळ उडवली. शहरातील अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडल्याने मोठ नुकसान झालं तर दुसरीकडे या पावसात अकोल्यातील विकास कामांची पोलखोल केली आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलावर पाणी साचलं. उड्डाण पुलावर पाणी साचल्याची ही घटना अकोलेकरांसाठी आश्चर्याची गोष्ट ठरली.



जेल चौक ते कारमेल शाळे पर्यंत असलेल्या या पुलावर सुमारे 9 इंच पाणी साचलं. उड्डाणपुलावरील पाणी वाहण्यासाठी बनविलेले पाईप चोकअप झाल्याने हे पाणी साचलं असल्याचे म्हंटले जात आहे.  तर हा पुल चुकीच्या पद्धतीने तयार झाला असल्यामुळे पाणी साचले आसावे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. कारण पुलावर पाणी साचने, हे अनेकांनी आज पहिल्यांदाच पाहिले.




इतरवेळी याच उड्डाण पुलाखाली पाणी साचते. त्यामुळे येथे बच्चे कंपनी साठी जलतरण तलाव निर्माण होतो. यावेळी मात्र पुलाच्यावर आणि खाली पाणी तुंबल्याने येथील नजारा पाहण्यासारखा झाला आहे.



मान्सून पूर्व बरसणाऱ्या या पावसाने

आज जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सुद्धा शेतीच नुकसान केलं आहे.

सुमारे पंधरा मिनिट सुरू असलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली होती. अचानक सुरू झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरातील खुले नाट्यगृह जवळील लावलेलं हॉर्डींग सुद्धा वाकून गेलं. तर तोष्णीवाल लेआउट मधील रस्त्याच्या बाजूला असलेला एक विशाल झाड उन्मळून खाली पडलं आहे. खाली कोसळलेल्या या झाडाखाली सुमारे 10 दुचाकी वाहन आणि सायकली दबली आहेत तर काही दुचाकी गाड्यांचा मोठा नुकसान देखील झाले आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने हे झाड हटविण्याच कार्य सुरू आहेय. तर विजेचे तार तुटल्याने या भागाचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. ठिकठिकाणी वृक्ष पडल्याने विद्युत वाहिन्यांवर परिणाम होवून  अनेक भागातील विद्युत पुरवठा बंद झाला होता. अर्धअधिक शहर अंधारात गुडूप झालं होते.



या वादळी पावसात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. गोरक्षण रोडवरील पाटबंधारे विभाग कार्यालय समोरील होर्डींग कोसळले. अलीमचंदानी यांच्या टिव्हीएस शोरूम समोरील मुरली चहा सेंटर जवळील वृक्ष उन्मळून पडले. अनेक ठिकाणच्या सोलर प्रकल्पाच्या प्लेट उडून गेल्या. अचानक सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणची टिनपत्रे उडाली. यात 12 वर्षाचा मुलगा जखमी  झाला.  दुसरीकडे राधाकृष्ण टॉकीज समोरील हॉटेलचा छत कोसळून दोन जण जखमी झाले, त्यापैकी एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. आजच्या या पावसाने शहरातील अनेक भागात मोठे नुकसान केले आहे.



टिप्पण्या