- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
rain-akola-dist-with-thunder : विजांच्या कडकडाटासह अकोल्यात पाऊस; वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, तर एक युवक शेतात मृतावस्थेत आढळला
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला, दि. 11 : सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह आज मंगळवारी अकोला जिल्हयात जोरदार पाऊस पडला. दरम्यान वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात वीज कोसळल्याने एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत एक युवक शेतात मृत आढळून आला. त्याचाही मृत्यू वीज कोसळून झाला असावा, अशी चर्चा आहे.
पहिल्या घटनेत, मूर्तिजापूर तालुक्यातील टीपराळा येथील शालिग्राम श्रीराम डोंगरे (वय वर्ष 65) हे त्यांच्या शेतात झाडाखाली थांबले असताना आज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ब्रह्मी खुर्द येथील तलाठी यांनी अहवाल दिला आहे.
त्याचप्रमाणे, मौजे खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे (वय अंदाजे 26 वर्ष) हा युवक सोपान टापरे यांच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आला. त्याचा विजेमुळे मृत्यू झाला, अशी चर्चा आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा