- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
police recruitment process akl: पावसामुळे पोलीस भरती प्रक्रियेत अडथळा; हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी तात्पुरती स्थगित
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला: अकोला पोलीस दलात १९५ पोलीस शिपाई पदासाठी १९ जुन पासून भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र आज २२ जुन रोजी अकोल्यात बरसलेल्या पावसामुळे अडथळा आला. आजच्या पोलीस भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला असून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आजच्या उमेदवारांची चाचणी आता ९ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले.
अकोला पोलीस घटकात १९५ पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया ही १९ जुन पासुन सुरु आहे. आज २२ जुन रोजी एकुण १००० उमेदवारांना भरती प्रक्रीया साठी बोलविण्यात आले आहे. काल रात्री व आज सकाळी झालेल्या पावसामुळे चाचणी स्थळ पोलीस मुख्यालय येथील मैदान तसेच वसंत देसाई स्टेडीयम येथील मैदानावर पाणी साचल्याने आणि संपूर्ण मैदानात ओल असल्याने शारीरीक चाचणी होवू शकत नाही. अकोला घटकातील पोलीस भरती साठीचे वेळापत्रक हे ठरलेले असुन त्यानुसार भरती प्रक्रीया ०८ जुलै पर्यत आहे. त्यामुळे आज रोजीच्या उमेदवाराना शारीरीक चाचणी साठी ०९ जुलै २०२४ रोजीची तारीख देण्यात आली आहे.
आज रोजी आलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी तसेच उंची व छातीचे मोजमाप घेण्यात येत आहे. आज जे उमेदवार पाऊसामुळे भरती प्रक्रीया साठी उपस्थित राहु शकले नाहीत त्यांची कागदपत्र पडताळणी, उंची व छाती मोजमाप व शारीरीक चाचणीची संपुर्ण प्रक्रीया ही ०९ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
आज रोजी सकाळी आलेल्या पाऊसामुळे सर्व उमेदवारांची तात्पुरती थांबण्याची व्यवस्था राणी महल पोलीस लॉन येथे करण्यात आली होती. सदर उमेदवाराना पोलीस मोटार परीवहन विभागाचे वाहनामधुन पोलीस मुख्यालय येथुन राणी महल येथे तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आले होते, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा