- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोला शहराजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव टी पॉइंटवर ट्रक आणि दुचाकीचा आज सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला. सिमेंट रत्यावर निर्माण झालेल्या भेगांमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनीमधे चर्चा होती.
सकाळी घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचाही घटना स्थळावरच मृत्यू झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी रस्त्यावरील असलेल्या भेगामुळे गाडी घसरली आणि मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक खाली आली. या अपघातात शिवणी येथील श्याम महाले आणि उमरी येथील सचिन जूनारे या व्यक्तींचा समावेश असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा