- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानंतर सोमवार 10 जून रोजी पश्चिम विदर्भातही मुसळधार पावसाने हजेरी दिली. अकोला शहरात सोमवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास सोसाट्याचा वारा अन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला.
अकोला शहराला सोमवारी रात्री मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं असून शहर जलमय झाले आहे. अनेक ठिकाणच्या सखोल भागात पाणी साचले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहर अंधारात गुडूप झाले.
अकोला सह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळला असल्याचे वृत्त आहे.
अकोला जिल्ह्याच्या अनेक भागात सोमवारी मध्यरात्री व मंगळवारी पहाटे पर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. नदी- नाले व ओढे तुडुंब भरून वाहू लागले. शेतशिवारालाही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
आज पाऊस
अकोला जिल्ह्यात आज, मंगळवारी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, तासी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
मृगच्या मुहूर्तावर जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, दोन दिवसापासून जिल्ह्यात काही भागात पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठीची लगबग सुरू झाली आहे. येत्या 15 जूनपर्यंत विदर्भात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा