havoc-rain-swimming-pool-wall: स्विमिंग पुलची आवार भिंत जमीनदोस्त; तर पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचा झाला तलाव, दुसऱ्या घटनेत रिक्षावाला सुदैवानं बचावला




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: काल गुरुवारी सायंकाळी अकोला शहरात आलेल्या वादळी वारा , गारपिट आणि जोरदार पावसाने धिंगाणा घातला. वसंत देसाई क्रीडांगण येथील जलतरण तलाव कडील आवारभिंत वादळी वारा आणि जोरदार पावसाने जमीनदोस्त झाली आहे. तर बाजूलाच असलेले जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाला तलावाचे स्वरूप आले. तर मोहम्मद अली रोडवरील एका घटनेत सायकल रिक्षावाला सुदैवानं बचावला.



जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत येत असलेल्या व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या देखरेखीखाली करार पद्धतीने चालविण्यात येत असलेल्या संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण मधील जलतरण तलावाची आवरभिंत पावसाच्या आणि वादळी वाऱ्याच्या जोराने जमीन दोस्त झाली आहे. 


ही भिंत अलीकडच्याच काळात बांधली आहे. मात्र थोड्याशा पावसात देखील ही भिंत कोसळल्याने नक्कीच कुठेतरी आधीच पाणी मुरले असल्याचे उघड पडले.






अकोला शहरातील आगरकर विद्यालयाच्या परिसरात असलेल्या जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष कार्यालयाला गळती लागली. 



काल जोरदार आलेल्या पावसाने या कार्यालयाच मोठ नुकसान झालं आहे. जोरदार वाऱ्यामुळे येथील काही टिन उडून गेले तर छतातून पाणी गळायला लागले. यामुळे कार्यालयाला तलावाचे स्वरूप आले. छतातून पाणी गळती सुरू झाल्याने संपूर्ण कार्यालयातील कागदपत्र भिजली तर पावसाचे पाणी कार्यालयात साचले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. 



जरजर झालेल्या या इमारतीत एरव्ही देखील कर्मचारी आपला जीव मुठीत घेवून दररोज काम करीत असतो. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.



शहरातील मोहम्मद अली चौकात एका घरावरील बसवलेले सोलर पॅनल जोरदार वाऱ्यामुळे उडून खाली पडले. 




हा सर्व सर्व घटनाक्रम सीसीटिव्हीत कैद झालं आहे. रहदारीच्या या रस्त्यावर वारा सुटल्यानंतर सोलर पॅनल शीट खाली पडले आणि येथेच खाली उभ्या असलेल्या सायकल रिक्षावाल्याच्या अगदी काहीच अंतरावरून निघून गेले. दैव बलवत्तर म्हणून रिक्षावाला बचावला. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने या पॅनलमुळे कुणालाही इजा पोहचली नाही.



टिप्पण्या