- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: कोरोना काळात काढलेल्या पॉलिसीचा पॉलिसी धारकाला रुग्णालयात उपचार घेतल्यावर व कोरोना झाल्याची लॅब प्रमाणपत्रे उपलब्ध असतांना त्याला पॉलिसीचा संपूर्ण लाभ देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाने दिला. ॲड. इलयास शेखानी यांनी फिर्यादी तर्फे फिर्याद दाखल केली.
स्थानीय दीपक चौक येथील व्यापारी सय्यद ईसामुद्दीन सै अफसरोद्दीन यांनी 11 आगस्ट 2020 रोजी करोना संकटकाळात अडीच लाख रुपये मूल्याची ओरिएंटल विमा कंपनीची विमा रक्षक पॉलिसी काढून त्याचा प्रथम हफ्ता 3438 रुपये भरले होते. कंपनीने क्लेम देतांना शासकीय लॅबकडून पॉझिटिव्ह अहवाल व आजाराच्या उपचारा साठी 72 तास रुग्णालयात ऍडमिट असणे हे नियम ठेवले होते. उपरोक्त कागदपत्रे दिल्यावर पॉलिसीचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते.
सय्यद ईसामुद्दीन सै अफसरोद्दीन यांना करोनाची लागण झाल्यावर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपली चाचणी करून घेतली. पॉझिटिव्ह वैद्यकीय अहवाल आल्याने सय्यद ईसामुद्दीन सै अफसरोद्दीन हे उपचारासाठी रावणकर हॉस्पिटल स्कायलार्क कोविड केअर सेंटर येथे दाखल होऊन त्यांनी 6 दिवस उपचार घेतला. त्यानंतर त्यांनी 10 दिवस घरी कोरोन्टाइन राहून उपचार घेतला.
प्रकृती बरी झाल्यावर सय्यद ईसामुद्दीन सै अफसरोद्दीन यांनी पॉलीसी लाभ मिळण्याकरिता ओरिएंटल विमा कंपनी कडे क्लेम दाखल केला. मात्र कंपनीने रुग्णालयात उपचारासाठी भरती होण्याची गरज नव्हती, या कारणावरून त्यांचा क्लेम नामंजूर करीत पॉलिसीचा लाभ देणास नकार दिला.
कंपनीच्या या निर्णया विरोधात सय्यद ईसामुद्दीन यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात दावा दाखल केला. आयोगाने अर्जदार व कंपनी या दोन्ही पक्षाचे म्हणणे व पुरावे,कागदपत्रे तपासून यात ओरिएंटल विमा कंपनी दोषी असल्याचे सकृत दर्शनी आढळून आले. सबब ओरिएंटल विमा कंपनीने अर्जदार सय्यद ईसामुद्दीन सै अफसरोद्दीन यांना 2.50 लाख रुपये पॉलीसी मूल्य,शारीरिक व मानसिक त्रासपोटी 5 हजार रुपये व प्रकरण खर्चापोटी 3 हजार रुपये 45 दिवसाच्या आत देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सादिक अली बशीर सैय्यद, सदस्य सुहास आळशी, नीलिमा बेलोकार यांच्या मंचाने दिला.अर्जदार सय्यद ईसामुद्दीन यांच्या तर्फे एड इलयास शेखानी यांनी कामकाज बघितले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा