akola-police-force-recruitment: अकोला पोलीस दल भरती प्रक्रियेला प्रारंभ; भरती प्रक्रिया पारदर्शक होण्याकरीता तांत्रिक उपकरणांचा वापर





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोल्यात पोलीस दलात भरती प्रक्रियेला आज पासुन सुरुवात झाली आहे. भरतीकरीता एकुण 21853 उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरले आहेत. यामध्ये 16161 पुरुष उमेदवार, 5691 महिला उमेदवार तसेच 01 तृतीयपंथीचा समावेश आहे.



उमेदवारांचे शारीरीक तसेच कागदपत्रे पडताळणी चाचणीकरीता पोलीस मुख्यालय निमवाडी अकोला येथे आज पहाटे चार वाजता पासुन प्रक्रिया सुरू झाली आहे.





सुरुवातीचे दोन दिवस सर्वसाधारण प्रवर्गातील 800 पुरुष उमेदवारांना बोलाविण्यात आलं आहे. ही भरती प्रकीया एकुण 17 दिवस चालणार असून त्यामध्ये रविवारी एक दिवस भरती प्रक्रीयेला विराम देण्यात आला आहे.





आजच्या मैदानी चाचणीत उमेदवारांची 100 मीटर, 800 मीटर व 1600 मीटर धावणे आणि गोळा फेक चाचणी घेण्यात येत आहे. तर पहिल्यांदाच पोलीस भरतीत अकोला उंची आणि छाती मोजण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्याकरीता तांत्रिक उपकरणांचा (RFID) वापर सुद्धा करण्यात आलेला आहे.





टिप्पण्या