- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
youth-dies-in-quarry-kumbhari: डाबकी रोड परिसरातील युवकाचा कुंभारी जवळील खदानीत मृत्यू; मित्रांसोबत पोहण्यासाठी जाणे बेतले जीवावर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
खदानीत बुडालेल्या युवकास संत गाडगे बाबा आपात्कालीन पथकाच्या जवानांनी शोधून बाहेर काढले.
मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोला यांची धाडसी कारवाई
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: डाबकी रोड परिसरात राहणारा युवक आपल्या सात आठ मित्रांसोबत कुंभारी जवळील खदानीत बुधवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा खदानीत बुडून दुर्दैवी अंत झाला.
कुंभारी ते विझोरा रोडवरील बार्शीटाकळी पोलीस हद्दीतील कुंभारी नजिक असलेल्या खदान मध्ये अकोला शहरातील डाबकी रोडवरील गजानन नगर मधील सोनु वानखडे वय अंदाजे (20) वर्ष हा आपल्या 7 ते 8 मित्रांसह 29 मे रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता. सायंकाळी पोहणे झाल्यानंतर सर्व मित्र पाण्याबाहेर आले. मात्र त्यांना सोनू दिसतं नव्हता. सर्वांनी त्याला हाक दिल्या. मात्र कुठलाही प्रतिसाद आला नाही. परिसराच्या आजू बाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू सोनू दिसून आला नाही.
दरम्यान खदानीत युवक बुडाला असल्याची माहीती बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे यांना मिळाली. त्यांनी ही माहीती मिळताच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देवून तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले.
जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयूर सळेदार, विष्णु केवट, अंकुश सदाफळे, ऋषिकेश राखोंडे, शेखर केवट, संकेत देशमुख, गोकुळ तायडे, संतोष वाघमारे, रोहन मुंढे,योगेश कुदळे, यांचेसह शोध व बचाव साहित्य, जनरेटर, लाईट सेटअप आणि आपात्कालीन वाहनासह घटनास्थळी रात्री 9:00 वाजता पोहचले.
पथकाने सिन ट्रेस केला खदान 25 ते 30 फुट खोल पाणी आणि तळाशी मोठ मोठ्या टोकदार दगड चिफा असल्याचे निष्पन्न झाले. अशा कंडिशन मधे अंडर वाॅटर सर्च ऑपरेशन करणे फारच अवघड असते. रेस्क्युवरला ईजा होण्याची दाट शक्यता असते. यामुळे अतिशय बारकाईने तळाशी शोध घ्यावा लागतो. ही सर्व परीस्थीती लक्षात घेऊन ठाणेदार शिरीष खंडारे यांच्या आदेशाने पथकाने लगेच सर्च ऑपरेशन सुरू केले.
अर्ध्या तासात पथकातील जवानांनी तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढला. यावेळी बार्शीटाकळीचे एएसआय विजय इंगळे आणि पोलीस कर्मचारी तसेच नातेवाईक हजर होते, अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा