- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
water-supply-akola-city-repair: जेल चौकातील व्हॉल्व दुरूस्तीच्या कामासाठी शहरातील पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार - अकोला मनपा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोला शहराला पाणी पुरवठा करणारी 65 एम.एल.डी. जलशुध्दी केंद्रावरून येणा-या मुख्य जलवाहिनीवरील 700 मि.मि. व्यासाचा व्हॉल्वर जेल चौकातील अधिकारी निवास जवळ असलेला मुख्य व्हॉल्व नादुरूस्त झाल्याने त्याला दुरूस्ती करण्यासाठी जवळवास दोन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अकोला शहरातील केशव नगर, आदर्श कॉलोनी, नेहरू पार्क, तोष्णीवाल ले-आऊट, रेलवे स्टेाशन परिसर, मराठी शाळा क्रं. 7, आकोट फैल, गंगा नगर, जोगळेकर प्लॉट, लोकमान्य नगर आणि उमरी, मलकापुर व खडकी या जलकुंभांवरून होणारा पाणी पुरवठा 31 मे आणि 1 जून 2024 रोजी दोन दिवस बंद राहणार असल्यााबाबत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले.
शहरातील नागरिकांनी याची नोंद घेवून मनपा प्रशासनास सहकार्य करावे तसेच पिण्याचा पाण्याचा वापर काट कसरीने करावा व पाण्याची पुरेशी साठवणूक करून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा करण्यात येत आहे.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांनी पाहणी केली असून उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता सदरचे काम युध्द पातळीवर पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या.
यावेळी मनपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे, अभियंता शैलेश चोपडे, नरेश बावणे, कैलाश निमरोट, आशिष भालेराव आदींची उपस्थिती होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा